खरंच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅचूला एका महिन्यातच तडे गेले का?

सोशल मीडियावर रोज नवनवीन गोष्टी वायरल होत असतात. त्यात कधी काही खऱ्या गोष्टी तर कधी खोट्या अफवा वायरल होतात. सध्या सोशल मीडियावर सरदार पटेल यांच्या स्टॅचूला तडे गेल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहेत. खरंच ३००० कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या स्टॅचू ऑफ युनिटीला तडे गेले आहेत का? खरोखर सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या स्टॅचू ऑफ युनिटीमध्ये तडे जाऊन मूर्ती तुटत आहे का? सोशल मीडियावर वायरल झालेल्या पोस्टमध्ये हाच दावा करण्यात आला आहे.

काय आहे वायरल पोस्टमध्ये?

वायरल पोस्टमध्ये काही फोटो आहेत. गुजरातमधील सरदार पटेल यांच्या मूर्तीचे फोटो. खूप झूम करून हे फोटो काढण्यात आलेले आहेत. यामध्ये पायांचा भाग झूम करून दाखवण्यात आला आहे. यामध्ये पांढऱ्या रेषा दिसतात. लोकांचे लक्ष जावे यासाठी त्यांना गोल राउंड करून दाखवण्यात आले आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे कि त्या पांढऱ्या रेषा ज्या दिसतात ते मूर्तीला गेलेले तडे आहेत.

फोटोसोबत जो मेसेज वायरल झाला आहे त्यामध्ये लिहिलेले आहे कि,

‘ दोन हजारांच्या नोटांमध्ये दोन वर्षात अडचणी आल्यानंतर आता उदघाटनानंतर अवघ्या दोन महिन्यात सरदार पटेल यांच्या मूर्तीमध्ये देखील तडे गेले आहेत.

काय आहे सत्यता?

तुम्ही स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला तिथे मोदींच्या हस्ते उदघाटन झालेले फोटो बघायला मिळतील. उदघाटनाची दिवशीचे अनेक फोटो वेबसाईटवर आहेत. त्यामध्ये काही झूम करून काढलेले फोटो देखील आहेत. त्या फोटोमध्ये लक्ष देऊन पाहिल्यास तुम्हाला पांढऱ्या रेषा दिसतील.

म्हणजेच ते तडे गेले म्हणून वायरल झालेले फोटो चुकीचे असल्याचे सिद्ध होते. त्या पांढऱ्या रेषा या जिथे २ भाग जोडले जातात तिथे प्लास्टर केल्यानंतर जसे दिसतात ताशा स्वरूपाच्या आहेत. यासाठी खालील फोटो बघून तुम्हाला थोडी कल्पना येईल.

काय म्हणाले स्टॅचू ऑफ युनिटीचे इंजिनिअर-

पी सी व्यास हे स्टॅचू ऑफ युनिटीचे प्रमुख इंजिनिअर आहेत. त्यांच्या मते ते तडे मुळीच नाहीयेत. मूर्ती हि वेगवेगळे पॅनल जोडून बनवण्यात आलेली आहे. हे पॅनल वेगवेगळ्या साईझचे आहेत. दोन मायक्रो पॅनलला जोडण्यात आलेले आहे. मूर्तीवरील त्या पांढऱ्या रेषा या विशिष्ट प्रकारच्या वेल्डिंगचा भाग आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *