निक आणि प्रियंकाची अशी झाली होती पहिली भेट !

नुकतेच प्रियंका चोप्रा व निक जोन्स यांचे लग्न भारतात झाले. जोधपूर येथे मोठा आलिशान पॅलेस विवाहाकरिता बुक करण्यात आला होता. निक आणि प्रियंकाची पहिली भेट कशी झाली याबद्दल दोघांनी एका मासिकाला मुलाखत देऊन त्यांच्या लव्ह स्टोरी बाबत माहिती दिली. कशा प्रकारे दोघांची प्रेम कहाणी सुरु झाली याबाबत अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर आपण खासरे वर पाहूया निक प्रियंका ची प्रेमकहाणी…

प्रियंका हि बॉलिवूड मधील यशस्वी अभिनेत्री आहे सोबतच तिने हॉलिवूड मध्ये हि आपला जम बसवला आहे. हॉलिवूड मधील क्वांटिको या सिरीयल मुळे प्रियंका पाश्चात्य देशात घरोघरी पोहचली आहे. क्वांटिको या सिरीयल मध्ये प्रियंका ला पाहून निक जोन्स एकतर्फी प्रेमात पडला. व सुरुवातीला त्याने क्वांटिको मधील त्याच्या काही मित्रांमार्फत प्रियंका बद्दल माहिती घेतली. निक जोन्स याचे सध्या वय हे २६ वर्ष आहे तर प्रियंका हि ३६ वर्षाची आहे.

क्वांटिको मधील प्रियंका चा सह कलाकार ग्राहम रोजर्स हा निक याचा सुद्धा मित्र आहे. त्याच्याशी बोलून निक ने प्रियंका ला तिच्या ऑफिशल ट्विटर वर पहिल्यांदा मेसेंज केला. आपल्या कॉमन मित्रांना वाटते कि आपण दोघांनी एकमेकांना भेटले पाहिजे. हा मॅसेज प्रियंकाने पाहिल्यावर तिने सर्वात पहिला रिप्लाय केला कि येथे माझी टीम पण हे मेसेंज वाचते आपण मोबाईल वरील मेसेंज वर बोलूया आणि येथून त्यांचे ६ महिने चॅटिंग झाले.

त्यानंतर पहिल्यांदा न्यूयॉर्क मधील एका ड्रिंक पार्टी मध्ये निक आणि प्रियंका यांची भेट झाली होती. त्याच्या काही महिन्यांनी दोघे एका मॅगजीन च्या कार्यक्रमात एकत्र रॅम्पवॉक करताना एकत्र आले. या भेटीनंतर प्रियंकाने निक ला तिच्या घरी बोलावले. निक पहिल्यांदाच प्रियंका च्या घरी आला तेव्हा प्रियंकाची आई पण घरी टीव्ही पाहत होती. दोघांनी एक दोन तास गप्पा मारल्या.

प्रियंका हिच्या सोबतच्या तिसऱ्या डेट मध्ये निक ने ग्रीस मध्ये तिला प्रपोज केले. त्यासाठी निक ने करोडो रुपयाची रिंग खरेदी करून ठेवलेली. ग्रीस मध्ये गुढग्यावर बसून निक ने प्रियंका ला हि अंगठी मी तुझ्या बोटात घालू शकतो का ?? तू माझ्यासोबत लग्न करशील का असे विचारले. काही सेकंड प्रियंका पाहतच राहिली आणि होकार कळवला.

येथून त्यांची प्रेम कहाणी विवाह पर्यंत पोहचली आहे. या दोन्ही दाम्पत्यांनी विवाह ख्रिश्चन पद्धतीने भारतात केला आहे लवकरच अमेरिकेत हि ते पुन्हा विवाह करतील असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनास आमच्याकडून शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *