अजय बिष्ट हा एका सामान्य कटुंबातील युवक योगी आदिनाथ कसे झाले नक्की वाचा..

अजय बिष्ट हा एका सामान्य कटुंबातील युवक आज योगी आदिनाथ या नावाने ओळखला जातो. पण त्याचा हा प्रवास कसा झाला ते पाहणे उत्सुकतेचे आहे. ५ जून १९७२ साली उत्तराखंड मधील गौडीवाल जिल्ह्यातील यमकेश्वर तालुक्यातील पंचूर या छोट्या खेडे गावात वडील आंनद सिंह बिष्ट आणि आई सावित्री या राजपूत दाम्पत्यांच्या घरी योगी आदिनाथ यांचा जन्म झाला. वडील फॉरेस्ट ऑफिसर तर आई गृहिणी सोबत ७ भाऊ बहिणीचे मोठे कुटुंब योगी चे होते.

अजय बिष्ट चे शिक्षण सर्वसाधारण मुलांच्या प्रमाणे झाले आहे त्यांचे शिक्षण स्थानिक शाळेत झाले नंतर १०वी नंतर त्यांचे शिक्षण ऋषिकेश येथे झाले. पदवीचे शिक्षण करत असतानाच म्हणजेच १९९० साली त्यांचा संबंध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोबत आला. आणि येथूनच त्यांच्या जीवनातील दिशा बदलली. १९९३ मध्ये रॅम मंदिराच्या आंदोलनाचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला. व त्यांचे पदवीत्तर शिक्षण मागे पडले.

गुरु गोरखनाथ यांच्यावर अभ्यास करण्यासाठी ते गोरखपूर येथे आले येथे त्यांचा संबंध महंत अवैद्यनाथ यांच्या सोबत आला. त्यांच्या एकदम प्रभावाखाली येऊन त्यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. येथेच अजय बिष्ट चे नाव योगी आदिनाथ हे झाले. १९९४ साली त्यांनी पूर्णपणे सन्यास पत्करला.

गोरखपूर येथे महंतांच्या सानिध्यात मनोभावे काम करून त्यांनी महंतांचे ह्रदय जिंकले. व त्यांना गोरखपूर मठाचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले. त्यांनी हिंदुत्वाची कट्टरतावादी भूमिका घेऊन १९९८ साली वयाच्या २६ व्या वर्षी भाजप मार्फत खासदारकीची निवडणूक लढवून देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला.

२००२ मध्ये हिंदू युवा वाहिनी स्थापन करून कट्टर हिंदुत्वाचे राजकारण सुरु केले आता पर्यंत ते ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयात त्यांची महत्वाची भूमिका राहिली. व त्यांना उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री म्हणून भाजपने निवडले. सध्या त्यांचे उत्तरप्रदेश मधील काम जोरदार सुरु आहे.. भाजप च्या प्रचार यंत्रणेत ते देशातील स्टार प्रचारक म्हणून हि प्रचार करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *