‘चहावाल्या, एवढं मारेन की कानातून रक्त येईल;’ ओवेसींचे प्रक्षोभक भाषण..

तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. ७ डिसेंबरला तेलंगणात निवडून पार पडणार आहे. त्यामुळे मोठ-मोठ्या नेत्यांच्या सभांनी तेलंगणामधील वातावरण ढवळून निघाले आहे.

एमआयएमने देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी काँग्रेस आणि भाजपावर वारंवार टीका करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओवैसींना रविवारी एका सभेत थेट इशारा दिला होता. योगी म्हणाले होते, ‘तेलंगणात भाजप सत्तेत आले तर ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल’.

योगींच्या टीकेवर उत्तर देताना ओवैसींनी ही पलटवार केला आहे. हिंदुस्थान मेरे अब्बा का है, मै नही जाऊंगा,’ हा देश तुमचा आहे, माझा नाही?, भाजपा विरुद्ध बोलणे, मोदींविरुद्ध बोलणे, आरएसएसविरुद्ध बोलणे, योगींविरुद्ध बोलणे आणि त्यांच्या विचारांना विरोध केल्यामुळे देश सोडावा लागेल? असे प्रश्न ओवैसींनी योगींना विचारले आहेत.

खासदार असदद्दुीन ओवेसी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये वार-पलटवार मध्ये आता अकबरुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी प्रक्षोभक विधान करून खळबळ माजवली आहे.

हैदराबादमधील चारमिनार विधानसभा मतदारसंघातील रॅलीला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी हे खळबळजनक विधान केलं आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे.

काय म्हणाले अकबरुद्दीन ओवेसी?

‘चहा वाल्या, आम्हाला उकसवू नका. चहा-चहा ओरडता, लक्षात ठेवा एवढं बोलेन, एवढं मारेन की कानातून रक्त बाहेर येईल’, असे वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. या विधानामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका झालेली बघायला मिळत आहे.

बघा भाषणाचा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *