नाळच्या यशानंतर सैराट २ येतोय ! वाचा सैराट २ ची बातमी खरी कि खोटी?

सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं नाव कमावलं होतं. आर्ची-परशाची आगळीवेगळी लव्हस्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली होती. महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी जीव ओवाळून टाकला आहे. सैराट चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसला होता. पण या चित्रपटाचे कथानक सैराटला विक्रमी कमाई करण्यासाठी पुरेशे ठरले.

मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात सैराटची कमाई सर्वोच्च ठरली. सैराट हा पहिला मराठी चित्रपट होता ज्याने १०० कोटींचा जादुई आकडा बॉक्स ऑफिसवर पार केला. फॅन्ड्री या चित्रपटानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा हा खास चित्रपट होता. या सिनेमातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

सैराटची जादू अजूनही रसिकांच्या मनावर कायम आहे. नुकताच दिग्दर्शक- अभिनेता नागराज मंजुळे व झी स्टुडिओज यांची प्रस्तुती असलेला ‘नाळ’ हा चित्रपट रिलीज झाला. हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १४ कोटींची विक्रमी कामे केली आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे सैराट २ घेऊन येत असल्याची माहिती समोर आली आहे. पण यामध्ये खरंच आहे का?

याविषयी नागराज मंजुळेल पत्रकारांनी विचारले असता त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. नागराज मंजुळे म्हणाले, ‘सैराट तयार झाल्यानंतर माझ्या मनात दुसरा भागाची देखील कथा होती. पण मी कोणताही चित्रपट बनवताना त्याचा सिक्वल बनवेल असा विचार करत नाही.’

यावरून सध्या तरी सैराट २ येणार हि बातमी खोटीच असल्याचे सिद्ध होते. पण त्यांनी सैराट २ बनवा अशी लोकांची इच्छा असल्याचा उल्लेख देखील केला आहे. म्हणजे भविष्यात मंजुळेंच्या मनात आले तर सैराट २ बघायला भेटू शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *