अंदमान येथील बेटावर धर्मप्रचारासाठी गेलेल्या अमेरिकन मुलाचे शेवटचे पत्र नक्की वाचा..

भारतात विविधता आहे हे आपण वाचले आहेच. ६ हजार जाती अनेक धर्म परंपरा सोबत अनेक राज्य संस्कृती हि या देशात आहेत. आपल्या देशात असा एक भूभाग आहे ज्या ठिकाणी आज पर्यंत कोणी गेले तर जिवंत वापस आले नाही. आता हा भूभाग म्हणजे त्या ठिकाणी भूत पिशाच्च असतील अशी कल्पना करू नका. तो भूभाग म्हणजे एक बेट आहे. अंदमान निकोबार बेटांच्या भागात नॉर्थ सेंटीनेल नावाचे छोटे बेट आहे. तिथं सेंटीनेलिज आदिवासी जमात राहते, हि जमात सुमारे ६० हजार वर्षांपासून त्याच ठिकाणी राहत आली आहे. त्यांची आजची संख्या ४० ते ५० असावी असे सांगितले जाते.

अमेरिकन नागरिक जॉन एलन चाऊ हा स्थानिक मच्छिमाराला लाच देऊन या ठिकाणी अनधिकृतरित्या गेला होता. तो तिथे जाऊन या जमातीच्या लोकांसोबत मैत्री करू इच्छित होता त्यासाठी त्याने काही खाद्य पदार्थ फ़ुटबाँल इत्यादी गोष्टी सोबत नेल्या होत्या. पण या बेटावरील जमातीला ते आवडले नाही व त्यांनी जॉन एलन ची बाण मारून हत्या केली व मृतदेह समुद्र किनारी अर्धवट पुरून टाकला. या घटनेत ज्या मच्छिमारांनी जॉन ला बेटावर सोडले त्या ७ मच्छीमाराना पोलिसांनी अटक केले आहे.

परंतु मृत्यू अगोदर त्याने घरच्या साठी एक पत्र लिहिले ते सगळ्या समोर आलेले आहे वाचा असे काय लिहिले होते या पत्रात. त्याने हे १३ पानाचे पत्र आपल्या घरच्यांना देण्याकरिता सांगितले होते. १६ नोव्हेंबर ला तो जेव्हा या बेटावर गेला तेव्हा मासेमार त्याची किनार्यावर वाट बघत थांबले होते. तो परत आला पण त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. मासेमारांनी त्याला घरी चालण्याची विनंती केली. पण त्याने हे पत्र दिले व तो परत बेटावर गेला.

त्या नंतर १७ तारखेला सकाळी त्याचा मृतदेह, मासेमारांनी आदिवासी लोकांकडून किनाऱ्यालगत पुरताना बघितला. कपड्यावरून तो जॉन होता हे स्पष्ट झाले आहे. मानण्यात येते कि आदिवासी लोकांनी बाण मारून त्याची हत्या केली आहे.

जॉन आपल्या पत्रात लिहतो कि,
मी त्यांचा आवाज ऐकला. सर्वप्रथम मी त्यांच्या बाणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु मला त्यांचा आवाज स्पष्ट येत नव्हता त्यामुळे मी त्यांचा जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मी जेवढ्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यावरून लक्षात येत होते कि त्या लोकांना माझा राग येत होता. ते माझ्यावर ओरडत होते. ते लोक जे बोलत होते मीही तसाच बोलत होतो. त्यांची नक्कल करण्याचा मी प्रयत्न करत होतो. परंतु ते सर्व माझ्यावर हसायला लागले. कदाचित ते मला शिव्या देत होते. मला एक माणूस दिसला. तो त्यांचा लीडर असेल कारण त्याने पांढऱ्या रंगाचा मुकुट घातला होता. फुलांचा मुकुट होता तो, आणि तो उंच दगडावर बसून बोलत होता. दगडावर बसून असल्या मुळे मला तो त्यांचा नेता वाटत होता.

त्यांनी माझ्याकडे जेव्हा बाण उगारली तेव्हा मला भीती वाटण्यास सुरवात झाली. मी त्यांच्या कडे एक मासा फेकला. परंतु त्यांनी मला बाण मारला. दहा वर्षाचा मुलगा असेल तो ज्याने मला हा बाण मारला. त्याची ऊंची खूप कमी होती. बाकी सर्व लोक वयस्कर दिसत होते. माझ्या हाता जे बायबल होते त्यावर त्यांनी सरळ बाण मारला.

जर देवाला वाटत असेल की या बाणाने माझा मृत्यू व्हावा तर ठीक आहे. परंतु मला वाटते की मी जीवंतपनी जास्त काम करू शकतो. मी आत्ताही परतू शकतो इथे थांबलो तर माझा जीव जाणार हे नक्की आहे. हे देवा मला मरायच नाही आहे. मी मेलो तर माझी जागा कोण घेणार ? कोण माझे काम पूर्ण करणार ? हे देवा मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येत आहे. एका लहान मुलाने मला बाण मारला, देवा त्याला माफ कर ! या बेटावर राहणार्‍या सर्व लोकांना माफ कर ज्यांनी मला मारायचा प्रयत्न केला.

तुम्हाला मी वेडा वाटत असेल. परंतु मला माहिती आहे की या लोकांना प्रभू येशूच्या मार्गावर आणणे आवश्यक आहे. मी मेलो तर यांच्यावर नाराज नका होऊ. देवालाही दोष देऊ नका. देवांनी तुमचा मार्ग निवडला आहे त्यावर आपण आपले आयुष्य जगतो. या बेटावर येणे माझा मूर्खपण नाही आहे. या लोकांना मला प्रभू येशूची उपासना करताना बघायच आहे.

अशा पद्धतीने जॉन नी आपले शेवटचे शब्द आपल्या पर्यंत पोहचविले आहे. या जमातीला जगातील शेवटची ट्राइब म्हणून ओळखले जाते. या जमातीच्या संवर्धनासाठी १९६७ ते १९९१ पर्यंत भारत सरकार ने अनेक प्रयत्न केले.पण या जमातीने कधीच बाहेरील लोकांशी नाते ठेवायचा प्रयत्न केला नाही. म्हणून १९९१ पासून या प्रदेशात बाहेरील माणसाला जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीही काही लोक याठिकाणी अनधिकृत पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *