राजकीय फटकेबाजी करणाऱ्या सुप्रिया ताई सुळे यांची तलवारबाजी.. बघा व्हिडीओ

सुप्रिया ताई सुळे यांनी हातात तलवार घेऊन तलवारबाजी केली असा कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही कि ताई हातात कशाला तलवार घेतील. असा प्रश्न विचारला जाईल पण सुप्रिया ताई यांनी तलवार घेतली व तलवार पण चालवली. आता हि तलवार कोणत्या युद्धात नाही तर त्यांच्या बारामती लोकसभा मतदार संघात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आज हडपसर येथील एस. एम.जोशी महाविद्यालयामध्ये झाली. यामध्ये तलवारबाजीचाही समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या दरम्यान सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः हातात तलवार घेऊन प्रशिक्षका सोबत तलवारबाजी केली. हे पाहून उपस्थितात उत्साह पाहायला मिळाला. सुप्रियाताई ने कशी केली तलवारबाजी अवश्य पहा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *