मराठ्यांनी लाखोंचे मोर्चे काढून काय मिळाले म्हणणाऱ्या लक्ष्मण मानेना मराठा महिलेचे खुले पत्र..

काय म्हणाले होते उपरा’कार लक्ष्मण माने?

काल वंचित बहुजन आघाडीचा पुण्यात मेळावा झाला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रतिसादात हा मेळावा पार पडला. यावेळी अनेक उपस्थितांचे भाषणे यावेळी झाली. यावेळी उपरा’कार लक्ष्मण माने यांनी लाखोंचे मोर्चे काढून मराठ्यांना काय मिळाले असा सवाल केला.

माने म्हणाले, ‘आम्ही ज्यावेळी मोर्चे काढायचो त्यावेळी आमची टिंगल उडवली जायची. कारण आमचे मोर्चे हे १००-२०० चे असायचे. पण आता मराठ्यांनी लाखोंचे मोर्चे काढल्याने फडणवीस घाबरले असे तुम्हाला वाटले, पण एवढे मोर्चे काढून काय मिळाले?’

माने यांनी केलेल्या या प्रश्नास मराठा डॉक्टर महिलेने खुले पत्र लिहून उत्तर दिले आहे. नवी मुंबई येथील डॉक्टर कांचन पाटील वडगावकर यांनी हे खुले पात्र लिहिले आहे.

बघूया डॉ.कांचन पाटील-वडगावकर यांचे मानेंना लिहिलेले खुले पत्र-

प्रति -मा.लक्ष्मण माने महोदय,

मराठा क्रांती मोर्चाने मराठ्यांना काय दिले हे समजायला जातीवंत मराठाच असावे लागले…ज्या मराठा समाजाने आजवर सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ठेवली…त्या मराठा समाजाविषयीच्या द्वेषाने आंधळे झालेल्या तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार…की मराठा क्रांती मोर्चाने समाजाला काय दिले…?

आज शेकडो किलोमीटरवर राहणारे आणि कधीही एकमेकांना न भेटलेले मराठा बांधव एकमेकांच्या गरजेला धावून जात आहेत… आपल्या समस्या आमच्यासोबत शेअर करत आहेत… मराठा समाजाचे वकील बांधव एकही रुपयाची फीस न घेता मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं मराठा तरुणांवर झालेल्या केसेस लढवत आहेत… मराठा समाजातील व्यावसायिक एकमेकांना मदत करत पुढे यशस्वी मार्गक्रमणा करत आहेत…

शेकडो मराठा स्ञिया मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनांमध्ये हिरिरीने भाग घेत आहेत…एक ना दोन…हजारो सकारात्मक गोष्टी मराठा क्रांती मोर्चाने आम्हांला दिल्या आहेत.

पण मी हे सगळं तुम्हांला का सांगते आहे…?तुम्हांला तर मराठाद्वेषाची काविळ झाली आहे… ती काविळ उतरण्यासाठी हे डॉक्टरी इंजेक्शन देणे मला गरजेचे वाटले… शांत आहोत म्हणून अंत पाहू नका…बेताल वक्तव्ये करु नका.

डॉ.कांचन पाटील-वडगावकर(नवी मुंबई )

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *