सर्वात पहिले बाबरीच्या घुमटावर चढून कुदळ चालवणाऱ्या त्या तरुणांनी इस्लाम का स्वीकारला ?

६ डिसेंबर हि तारीख आज देशात एक वादग्रस्त दिवस म्हणून ओळखली जाते काही लोक या दिवसाला काळा दिवस म्हणून पाळतात तर काही जण या दिवसाचा अभिमान बाळगत या दिवसाला शौर्य दिवस म्हणून साजरे करतात. या दिवशी म्हणेजच ६ डिसेंबर १९९२ साली अयोध्या मध्ये बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. आता हि मस्जिद पाडण्यासाठी ज्या तरुणांनी सर्वात पहिले पुढाकार घेतला होता त्यांच्या बद्दल एक वेगळीच माहिती मिळत आहे.

आपण बाबरी मस्जिद बाबतच्या व्हिडीओ फोटो मध्ये त्यावेळी एक तरुणाचा समूह घुमटावर चढलेला पाहत आलाय. या तरुणात तीन असे तरुण होते कि ज्यांनी बाबरी वर सर्वात प्रथम चढून कुदळ चालवून बाबरीचा घुमट पाडला होता. या तरुणाची नावे बलबीर सिंह, योगेंद्र पाल आणि शिव प्रसाद अशी आहेत. यापैकी बलबीर सिंह आणि योगेंद्र पाल हे मित्र आहेत ते पूर्वाश्रमीचे आरएसएसचे आणि बाबरी पाडण्याच्या वेळी शिवसैनिक होते. तर शिव प्रसाद हा आयोध्यातील बजरंग दल चा कार्यकर्ता होता. शिवप्रसाद ने ४ हजार कार सेवकांना बाबरी पाडण्यासाठी प्रशिक्षण दिलेले.

अशा या कट्टर हिंदुत्ववादी तरुणांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. आपल्याला हे धक्कादायक वाटेल पण हे खरे आहे. का स्वीकारला त्यामागील त्यांची कथा अवश्य जाणून घ्या. बलबीर सिंह हा पानिपत हरियाणा या ठिकाणचा राजपूत जातीचा वडील हे गांधीवादी विचाराचे होते पण मुलगा बलबीर हा लहानपणीच संघाच्या विचाराच्या प्रभावात आला व संघसेवक म्हणून काम करू लागला. अनेक वर्ष संघात काम केल्यानंतर राम मंदिर चा मुद्दा चर्चेत आल्यावर त्याने संघाला सोडून शिवसेना मध्ये प्रवेश केला. सोबत आपल्या भावासोबत व्यवसाय हि सांभाळायचा. सोबत त्याने शिक्षण हि केले तो ट्रिपल एमए झालेला आहे.

बलबीर सिंह चे जीवन सर्व व्यवस्थित नॉर्मल सुरु होते.हळू हळू मुस्लिम विरोधी वातावरण पेटत होते. बाहेरील आक्रमकारी मुस्लिमांनी आपले मंदिर तोंडल्याची भावना त्याच्या मनात रुजत चालली होती. एक दिवस आला तेव्हा म्हणजे ५ डिसेंबर रोजी बलबीर सिंह आपला मित्र योगेंद्र पाल याच्या सोबत अयोध्येत पोहचला. अयोध्येत तेव्हा वातावरण गरम होते सर्वत्र जय श्रीराम चे नारे मंदिर वही बनायेंगे, कल्याण सिंह कल्याण करो, मंदिर का निर्माण करो अशा प्रकारे नारे लागल्या जात होते.

या वातावरणामुळे तर बलबीर सिंह हा त्यादिवशी एकदम खुंखार जनावर झाला होता. कोणत्याही परिस्थिती मध्ये बाबरी मस्जिद पाडायची हे त्याने आपल्या डोक्यात फिट केले. एका बाजूला भाजप संघ विश्वहिंदू परिषद यांच्या सभा तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि बजरंग दल ची प्रत्येक्ष बाबरी पडायचा प्लॅन.दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांच्या सोबत हजारो पोलिसांचे कठडे तोडून या पठ्ठ्यानी बाबरी मस्जिद मध्ये जीव उदार करून प्रवेश केला व घुमटावर चढले. त्यांच्या सोबत शिवसेना व बजरंग दल चे थोडेफार कार्यकर्ते होते. काही क्षणात बलबीर यांनी कुदळ घुमटावर मारायला सुरुवात केली. कुदळ मारून जेव्हा काही वेळात घुमटाच्या विटा निघायला लागल्या तेव्हा संपूर्ण देशातील वातावरण तंग झाले काही मिनिटात बाबरी चा घुमट उद्ध्वस्त करण्यात आला.

बाबरी मस्जिद पाडून बलबीर सिंह घरी पानिपत ला येण्यास निघाला तेव्हा त्याचे जागोजागी सत्कार करण्यात आले. शेवटी पानिपत मध्ये सत्कार करण्यात आल्या नंतर तो आपल्या घरी पोहचला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करून घरात तू रहा किंवा मी राहतो असे सांगितले तेव्हा बलबीर सिंह ने आपल्या पत्नीला सोबत येण्यास सांगितले पण तिने हि नकार दिल्यावर तो अनेक महिने भूमिगत राहिला. जेव्हा वडील वारल्याचे त्याला समजले तेव्हा घरी वापस गेला तेव्हा त्याच्या घरातील सर्वानी त्याच्यामुळे वडील वारले असे म्हणून त्याला घरात येण्यास मज्जाव केला.वडिलांनी हि सांगून ठेवले होते कि मृत्यूनंतर कोणतेही क्रियाकर्म बलबीर कडून घेऊ नका.

बलबीर सिंह याला सहा महिन्यांनी एक जोरदार झटका लागला जेव्हा त्याला समजले कि त्याचा मित्र योगेंद्र पाल हा मोहम्मद उमर बनला आहे त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. योगेंद्र हा देशभरात व त्याच्याभागात झालेल्या दंगलीमुळे मानसिकदृष्ट्या खचला आणि डिप्रेशन मध्ये गेला. त्याला वाटायचे आपण मोठे पाप केले आहे ज्यामुळे हजारो लोक मेले तेव्हा त्याने सोनिपत येथील मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या कडे जाऊन त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. बलबीर च्या मनात हि अपराधाची भावना तयार झालेली. तो पण मौलाना कलीम सिद्दीकी यांना भेटला व त्याने सांगितले कि मी बाबरी मस्जिद पाडण्यात पुढाकार घेतला होता. मला प्रायश्चित घेऊन मस्जिदी बांधायच्या आहेत.

बलबीर सिंह ला काही काळ मदरसा मध्ये राहण्यास सांगितले नंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारून मोहम्मद अमीर बनला. त्याने आता पर्यंत ५० मस्जिद बांधल्या आहेत. त्याच्या पत्नी ने देखील मुस्लिम धर्म स्वीकारला. बजरंग दलचा नेता असणारा शिव प्रसाद सुद्धा दंगली मुळे नैराश्यात गेला होता अनेक उपचार करून पाहिले. नंतर सौदी मध्ये नोकरीला गेला व तिकडेच त्याने इस्लाम कबूल करून मोहम्मद मुस्तफा झाला.

या तिन्ही तरुणाचे आज एकच म्हणणे आहे कि तरुणाईच्या जोश मध्ये एखादी आपण कृती करून जातो जिचा दूरगामी परिणाम होतो. अमन कि शांती हेच वास्तव आहे.

2 comments

  1. ही संपूर्ण माहिती खरी आहे यात काहीही शंका नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *