ऑफिस किंवा मॉल मधील टॉयलेटचे दरवाजे खालून अर्धे उघडे का असतात?

टॉयलेट हि दररोजच्या वापरातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती दिवसभरात अनेकदा टॉयलेटच्या वापर करतो. टॉयलेट हे स्वच्छतेच्या दृष्टीने देखील एक महत्वाचे संसाधन आहे. ग्रामीण भागात टॉयलेटच्या खूप कमी प्रमाणात वापर केला जातो. सरकारकडून वेळोवेळो याविषयी माहिती देऊन आता ग्रामीण भागात देखील टॉयलेटचा वापर वाढत आहे. नुकतेच अक्षय कुमारच्या टॉयलेट-एक प्रेम कथा या सिनेमातून देखील टॉयलेटचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टॉयलेट हि रोजची वापरातली गोष्ट असली तरी अनेकदा आपल्या मनात काही असेही प्रश्न असतात ज्याचे उत्तर आपल्याला मिळत नाहीत. असाच एक प्रश्न म्हणजे आपण मॉल मध्ये किंवा ऑफिसमध्ये टॉयलेटला गेल्यावर आपल्या डोक्यात येऊ शकतो. तो म्हणजे ऑफिस किंवा मॉलमध्ये असलेल्या टॉयलेटच्या दरवाजांची फर्शीपासून असलेली उंची. म्हणजेच दरवाजे हे खालून अर्धे उघडे का असतात. चला तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

पब्लिक टॉयलेट हे दिवसभर वापरले जातात. त्यामुळे तेथील फरशी लवकर घाण होते. अशावेळी ती साफ करण्यासाठी हे अर्धवट उघडे दरवाजे थोडे उपयोगाचे ठरतात. बऱ्याचदा अशा घटना देखील घडल्या आहेत ज्यामध्ये टॉयलेटच्या आत मेडिकल इमर्जन्सी घडलेली बाहेर कोणाला कळलीच नाही. त्यामुळे आवश्यक ती मदत देखील पोहचत नाही. अशावेळी दरवाजे खालून अर्धे उघडे असल्याने कोणाला आत मदत लागत असेल तर बाहेरून कळू शकते.

याशिवाय लहान मुले जेव्हा टॉयलेटमध्ये जातात तेव्हा ते चुकीने दरवाजा लॉक करून घेतात. मग त्यांना तो उघडता येत नाही. पण दरवाजे खालून थोडे उघडे असल्याने त्यातून लहान मुलं हे बाहेर देखील निघू शकता. सर्वात अगोदर याची सुरुवात हि अमेरिकेतून झाली होती. तेथील एका व्यक्तीच्या डोक्यात हि सुचली होती. दरवाजा छोटा केला तर पैश्याची बचत होते असा त्याचा उद्देश होता. पण तुम्ही म्हणाल एवढा छोटा दरवाजाचा भाग न लावल्याने किती बचत होणार आहे. पण जेव्हा मॉल किंवा ऑफिसमध्ये जास्त दरवाजे बसवायचे असतात तेव्हा मात्र बरीच बचत यामुळे होऊ शकते.

एक कारण हे पण आहे कि जेव्हा आपण टॉयलेट वापरतो तेव्हा बाहेरील व्यक्तींना आपले पाय दिसतात. त्यामुळे कोणी चुकूनही आतमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *