मुळशी पॅटर्न चित्रपटातील मुख्य पात्र आहे पुणेतील या डॉनच्या जीवनावर आधारित ?

मुळशी पॅटर्न हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात सुरु आहे. अनेकांना या चित्रपटातील पात्रांबद्दल उत्सकता लागली आहे. या चित्रपटातील स्टोरी खरेच खरी आहे का ? असेही अनेकांच्य्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत तर हा चित्रपट मुळशी भागातील एका डॉन च्या जीवनाशी मिळता जुळता आहे. आज आपण खासरे वर माहिती घेणार आहोंत कि कोण हा डॉन होता.

मुळशी तालुक्यातील एक गाव मुठा म्हणून या गावाला सामाजिक ऐतिहासिक राजकीय वारसा लाभलेला आहे. याच गावातील एक पेहलवान १९ ते २० वर्षाच्या तरुणाने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकून फक्त ३ वर्षात पुण्यात स्वतःचा मोठा दबदबा निर्माण केलेला. हा तरुण म्हणजे त्याचे नाव आहे संदीप मोहोळ श्रीमंतांचे मानगूट पकडणे आणि शेतकऱ्यांना चार पैसे जास्त पैसे मिळवून देण्याच्या त्याच्या कृतीमुळे त्याचा एक मोठा चाहता वर्ग तयार केलेला.

संदीप मोहोळ हा सुरुवातीला बोडके टोळी सोबत काम करायचा नंतर त्याने स्वतःची स्वतंत्र टोळी बनवली. कमी वयात म्हणजे २० व्या वर्षी त्याने एका गुन्हेगारी क्षेत्रातील मातबर व्यक्तीचा खून करून त्याने गुन्हेगारी क्षेत्रात आपला मोठा दबदबा निर्माण केला. ३ वर्षात संदीप मोहोळ याने अनेक गुन्हे करून आपली पकड घट्ट केलेली. त्याने गुन्हेगारी क्षेत्राला ग्लॅमर मिळवून दिले. अंगावर कडक पांढरे शुभ्र कपडे काळ्या रंगाची स्कार्पिओ अशी त्याची छाप पाडणारे व्यक्तिमत्व तेव्हा छाप पाडणारे होते. खून करण्याची पद्धती पण संदीप मोहोळ याची वेगळी होती.

संदीप मोहोळ हा गुन्हेगारी क्षेत्रातील एक मातबर बनल्यानंतर त्याने राजकारणात सुद्धा नशीब आपले नशीब आजमावले आहे. तो मुठा गावाचा बिनविरोध सरपंच राहिलेला.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माथाडी कामगार युनिअन च्या राज्याच्या अध्यक्षपदी हि त्याची निवड झालेली होती हि निवड होऊन थोडाच कालावधी झाल्यानंतर २००६ साली संदीप मोहळ याचा खून मारणे टोळीने केला. मुठा गावापासून कोथरूड पर्यंत येई पर्यंत ५ वेळा गणेश मारणे टोळीने संदीप मोहोळ याच्यावर जीवघेणे हल्ले केले शेवटी पौड रोडवरील गणपतीच्या समोर त्याच्या गाडीची काच फोडून त्याच्यावर गोळ्या घालून भरदिवसा त्याची हत्या केली.

संदीप मोहोळ याचे आई वडील आज हि कोथरूड भागात राहतात. त्याचे वडील आजही मार्केट यार्ड मध्ये काम करतात. आता चित्रपट प्रसिद्धीच्या मार्गावर होता तेव्हा संदीप मोहोळ याच्या बहिणीने चित्रपटात आपली व भावाची बदनामी केली जाते म्हणून चित्रपटाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. पण हा चित्रपट प्रसिद्ध झाला. ऐकून या चित्रपटात जो नायक दाखवला ती व्यक्तिरेखा संदीप मोहोळ याची आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *