रस्त्यावरून जाताना कधी कोणाला हार्टअटॅक आला तर काय कराल?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर वायरल झालेला बघायला मिळत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध बेशुद्धावस्थेत पडलेला आहे. आणि त्याच्या आजूबाजूला लोकं गर्दी करून उभा राहिले आहेत. रस्त्याने जाणारा एक व्यक्ती त्या पडलेल्या व्यक्तीला सावरत आहे. तिथे असलेला एक पोलीस कॉन्स्टेबल तत्परता दाखवून त्या व्यक्तीला CPR(Cardiopulmonary resuscitation) देत आहे. ज्यामध्ये विशिष्ठ प्रकारे हार्टअटॅक आलेल्या व्यक्तीच्या छातीला दाबले जाते. त्यामुळे तो बेशुद्ध व्यक्ती शुद्धीत पण येतो आणि ऍम्ब्युलन्स पण तिथे येते. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण देखील वाचतात.

हि घटना हैद्राबाद येथे घडली असून भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण ने या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. लक्ष्मण ने ट्विट करताना लिहिले आहे कि, ‘देव अशी बुद्धी आणि माणुसकी सर्वाना देवो. हैद्राबाद येथील बहादुरपुराचे कॉन्स्टेबल के. चंदन आणि इनायतुल्ला यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. त्यांनी त्या व्यक्तीला CPR दिला. दुसऱ्यांचे जीव वाचवणे हाच माणुसकीचा सर्वात मोठा धर्म आहे.’

व्हीव्हीएस लक्ष्मण ने यातून चांगला संदेश दिला आहे. हि गोष्ट प्रत्येकाला कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. आपण कधी रस्त्याने जाताना एखादा व्यक्तीचा श्वास रोखला तर अशावेळी CPR विषयी माहिती असणे फायद्याचे असते. एखाद्या चांगल्या माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून शिकून घ्यायला हवे. किंवा खाली एक व्हिडीओ देत आहोत. त्यातूनही थोडी उपयुक्त माहिती तुम्हाला मिळू शकते. एखादा प्रथमोपचार साथीचा कोर्स नक्की करायला हवा.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *