इंदुरीकर महाराज यांना एका महिलेचे खुले पत्र अवश्य वाचा

‘इंदुरीकर’ तुम्हाला ‘महाराज’ म्हणावं इतका महाराष्ट्र नक्कीच बुरसटलेला नाही..

आमच्यासाठी एकच महाराज होऊन गेले ते प्रजेची रक्षा करायचे आणि लाज राखायचे! तुमच्या घोगर्या आवाजातल्या घसाफोडीला ‘किर्तन’ म्हणून मला महाराष्ट्रातल्या रक्ताच्या किर्तनकारांना अपमानीत नाही करायचं! निरूपण कमी आणि थट्टाच जास्त!

“ती बघा.. कशी तोंड वाशीती.. त्यो बघा कसा बिनपाण्यानी लावतो.. बाप काय त्यो सख्खा बाप थोडीचय! आई काय तर मोबाईलवर बोलीती.. पोरगी काय तर पॅन्टशर्ट घालीती.. डोळ्याच्या सापटीत चमकी भरिती.. कपाळावर तिरका भांग पाडून मान झटिकती!
बाप भाजपात आन् पोरगं शेनेत आणि सुन बचतगटात!”

असलं एक वाक्य ऐकवत नाही आणि लोकं शिट्ट्या आणि टाळ्या वाजवतात??आपल्या लोकांचा प्राॅब्लेमच आहे.. एखाद्याला आमक्या तमक्मानी चांगलं किंवा वाईट म्हणलं की त्याला न-पारखताच चांगलं-वाईट म्हणायचं..
अरे कुणाच्या स्मरणार्थ पोपटपंची करताना विचार तर करायचा की वातावरण काय आहे.. लाफ्टर चॅलेंज सारखा माईक हातात पडल्यापासून टाईमअप होईपर्यंत काय नुसतं अय अय अय अअअअअअअय??
बाबा स्टॅन्डअप कमेडीन व्हा आपण.. पण सॉरी तिकडे तर खूप स्ट्रगल असतो! इथल्या सारखं एका सुपारीचे अडीच ते पाच लाख मिळत नाहीत ना आणि आपण तर एकाच दिवशी दोन तीन सुपार्या बसवता..
कुणी कुठुन आणि किती पैसा कमवावा हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण कुणी आम्हाला विषय बनवून शिट्ट्या, टाळ्या आणि सोबत पैसे गिळुन महाराष्ट्राची लोककला लावणीला तमाशा म्हणत असेल तर तुमची कलेकडे बघायची लायकी नाही असे मी म्हणेल!! जीला आजवर जिवंत ठेवणार्‍यांनी याच मातीत घाम आणि रक्त पण सांडलय..!

कपडे कमी घातल्याने बलात्कार होत नाही तर तुमच्यासारख्या कमी विचारातल्या नागड्या भावनांमुळे बलात्कार होतात..जेव्हा या श्वापद प्रवृत्ती लहानग्यांनापण त्यांची शिकार बनवते तेव्हा पण हेच म्हणणार 2 वर्षीय त्या मुलीनं कमी कपडे घातले..? त्या नराधमांना वय, कपडे, नाते, स्थळ, वेळ आणि काळ कशाचच वावडं नसतं…!
आणि एक मोबाइल किंवा सोशल मिडीयाने घटस्फोट होत नाहीत तर तुमच्या मानसिकतेने होतात…!
शेवटी काय तर कबीर पण बोलून गेला…

कामी-क्रोधी-लालची इनसे भक्ती न होय।।
भक्ती करे कोई
सुरमा जाती बरन कुल खोए।।

ऍड कविता शिवरकर-कलगुटकर

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *