टबभर चिल्लर देऊन आयफोन विकत घेण्यामागचं कारण विचार करायला लावणारं आहे..

चिल्लर म्हणलं कि आपल्यापैकि अनेकांना मकरंद अनासपुरेचा धम्माल उडवून देणारा अनामत रक्कमेचा किस्सा आठवेल. उमेदवारी अर्ज भरतेवेळी चिल्लर देऊन त्याने धम्माल आणली होती. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात हा किस्सा दाखवण्यात आला होता. हा सिन निव्वक मनोरंजन म्हणून दाखवण्यात आला होता. पण असाच एक चिल्लरचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा किस्सा आहे एका व्यक्तीने टबभर चिल्लर देऊन विकत घेतलेल्या आयफोनचा. पण यामध्ये कसल्याही मनोरंजनाचा प्रकार नव्हता तर यामागील कारण विचार करायला भाग पाडणारे आहे.

रशियातील एका व्यक्तीने टबभर चिल्लर देऊन आयफोन घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सर्वाना हा प्रकार हास्यास्पद वाटला. काहींनी सोशल मीडियावर त्या तरुणाला ट्रोल देखील केले. पण जेव्हा त्यामागचे खरे कारण समोर आले तेव्हा सर्व जण अवाक झाले.

आयफोन घेतलेला हा तरुण रशियातला प्रँकस्टार आहे. त्याच्या म्हणण्यानुसार रशियामध्ये चिल्लर म्हणजेच सुट्ट्या पैस्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. अनेकठिकाणी रशियात दुकानदार सुट्टे पैसे स्वीकारत नाहीत.एवढच नाही तर सुटते पैसे देणाऱ्या ग्राहकाला सुविधा देखील नाकारल्या जातात.त्यामुळे या तरुणाने हि शक्कल लढवत हा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न केला आहे.
तो आपल्याकडे असलेल्या भल्या मोठ्या टबमध्ये चिल्लर घेऊन दुकानात पोहचला. जवळपास ८० हजार रुपये चिल्लर स्वरूपात देऊन त्याने आयफोन खरेदी केला. हि चिल्लर मोजण्यासाठी दुकानातील कर्मचाऱ्यांना २ तास वेळ लागला. या तरुणाने चिल्लर देऊन आयफोन विकत घेऊन तेथील लोकांना मात्र एकप्रकारे चपराक दिली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *