नीता अंबानी यांनी खरेदी केलेल्या स्पेशल एडीशन ऑडी A9 चमेलियन ची किंमत ऐकून थक्क व्हाल..

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे नेहमीच चर्चेत असतात. अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जाते. मुकेश अंबानी यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबांतील इतर सदस्यांनी देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी ते एक बिझनेस वूमन अशी स्वतंत्र ओळख नीता अंबानी यांनी बनवली आहे. नीता अंबानी या देखील नेहमीच चर्चेत असतात. नीता अंबानी या खाजगी आयुष्य ऐशोआरामात जगतात. त्यांच्या महागड्या वस्तूंमुळे देखील त्या चर्चेत असतात.

अंबानी परिवाराविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी भारतीयांमध्ये खूप उत्सुकता असते. नीता यांनी खरेदी केलेली प्रत्येक गोष्ट न्यूज बनते. त्यांचे शौक, गाड्या, त्यांचे राहणीमान हे कसे असेल याविषयी अनेक जण जाणून घेऊ इच्छितात. नीता अंबानी यांच्या सकाळची सुरुवात तीन लाखाच्या चहाने होते. त्या महागड्या आणि ब्रँडेड घड्यांच्या शौकीन आहेत. याशिवाय त्यांना महागड्या हँडबॅग्सची सुद्धा आवड आहे. नीता अंबानी या आता पून्हा एकदा चर्चेत आल्या आहेत त्यांनी खरेदी केलेल्या महागड्या गाडीमुळे.

नीता अंबानी यांची गाड्यांची आवड सुद्धा लपून राहिलेली नाही. त्यांच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. त्यात आणखी एका महागड्या आलिशान गाडीची भर पडली आहे. नीता अंबानी यांनी स्पेशल एडीशन ऑडी A9 चमेलियन हि कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल..

नीता अंबानी यांनी खरेदी केलेली कार भारतात उपलब्ध नाहीये. त्यांनी खास अमेरिकेतून हि कार इम्पोर्ट केल्याचे बोललं जात आहे. स्पेशल एडिशन असलेल्या या गाडीचे मोजकेच युनिट बाजारात आलेले आहेत. या आलिशान गाडीची किंमत १०० कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *