उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदी मुंढेची बदली झाल्याची सोशल मीडियावर अफवा ! बघा कुठे झाली तुकाराम मुंढेची बदली..

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी नाशिकमधून ९ महिन्यातच बदली झाली आहे. तुकाराम मुंढे हे त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात. म्हणूनच त्यांना १२ वर्षांच्या सेवाकाळात ११ वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागला आहे. त्यांच्या बदल्यांचे कारण हे प्रामाणिक व धडाडीचे कामच असल्याचे यावरून दिसून येते.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यात मागील वर्षभरात मोठा संघर्ष झालेला बघायला मिळाला. त्यामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध केला. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्नही सत्ताधारी भाजपाने केला होता.

तुकाराम मुंढेंची बदली उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदी झाल्याची काल दिवसभर चर्चा होती. पण हि एक अफवा असल्याचे समोर आले आहे. तुकाराम मुंढेंची बदली मुंबईत झाली आहे. मुंढेंची मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली झाली आहे. त्या स्वरूपाचे अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी असलेलं पत्र मुंढेंना देण्यात आलं आहे.

त्यांची 2016 पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याही आधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी मुंढेंची नियुक्ती झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, ती केवळ अफवाच असून मुंढेंना मंत्रालयातच नियुक्ती देण्यात आली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *