16 चेंडूत 74 धावा ! अफगाणी फलंदाजाने आतषबाजी करत 4 षटकांत जिंकला सामना, बघा व्हिडीओ..

सर्वात जलद गतीने धावा काढणाऱ्या फलंदानांमध्ये युवराज सिंग, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांचं नाव सर्वात अगोदर घेतलं जातं. यासह अजून काही असे फलंदाज आहेत जे आपल्या आकर्षक फटकेबाजीने मन जिंकतात. पण आता अफगाणी खेळाडू सुद्धा फटकेबाजीमध्ये कमी नाहीत याची प्रचिती देत आहेत. स्फोटक खेळाडूंमध्ये अफगाणच्या खेळाडूचे देखील नाव घेतले जाऊ लागले आहे. अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने 16 चेंडूत 74 धावा फटकावत सामना अवघ्या ४ शतकात जिंकून दिला. त्याने 74 धावांच्या खेळीत आठ उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. टी-१० लीगमध्ये सिंधी आणि राजपूत संघात हा सामना झाला. बघा मोहमदच्या आतषबाजीचा व्हिडीओ..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *