ATM मधून फाटकी किंवा रंग लागलेली नोट निघाली तर काय करावं? जाणून घ्या उत्तर..

आपल्याला बऱ्याचदा ATM च्या बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी पैसेच नसतात तर कधी ATM मध्ये बिघाड या तर खूप सामान्य अडचणी आहेत. कधी काही महत्त्वाचे काम असेल आणि वेळेवर पैसे नाही निघाले तर माणसाचा पारा चढतो. या समस्येत अजून एक भर पडली आहे. ती म्हणजे ATM मधून फाटलेल्या, रंग लागलेल्या किंवा काही लिहिलेल्या नोटा निघणे. अशा नोटा निघाल्यास त्या बाहेर चलनात स्वीकारल्या नाही जात. मग अशावेळी खूप अडचण निर्माण होते. खासरेवर आज जाणून घेऊया अशा समस्या तुम्हाला आल्यास त्यावर काय उपाय आहे…

अनेक जणांना मागे अशा नोटा मिळाल्यास त्या कुठेच चलनात येत नव्हत्या. RBI कडे याविषयी बऱ्याच तक्रारी गेल्यानंतर RBI कडून बँकांना काही सूचना देण्यात आल्या होत्या. तुम्हाला ATM मधून फाटलेली, रंग लागलेली किंवा काही लिहिलेली नोट मिळाली तर तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन बदलून घेऊ शकता. यासाठी RBI ने सर्व बँकांना तसे आदेशच दिलेले आहेत. बँकेत तुमच्या अशा नोट स्वीकारण्यास नकार दिला तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार करू शकता.

यानंतर तुम्हाला कधीही ATM मधून किंवा कोणाकडून चुकून रंग लागलेली, फाटलेली किंवा काही लिहिलेली नोट आल्यास तुम्ही ती जवळच्या शाखेत जाऊन बदलून घ्या. 2014 मध्ये याविषयी RBI ने सांगितले होते की लिहिलेल्या नोटा स्वीकारल्या जातील. पुढे 2017 मध्ये लोकांनी अफवा पसरवली की फाटलेल्या आणि लिहिलेल्या किवा काही तरी लिहिलेल्या नोटा बँक स्वीकारत नाहीयेत.

पण त्यावर RBI ने स्पष्ट केले आहे की कोणतीही फाटलेली किंवा लिहिलेली नोट बँक नाकारू शकत नाही. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *