पर्यटकांसाठी जगात सर्वात जास्त फीस आकरणाऱ्या या देशात भारतीयांना आहे फ्री प्रवेश …

एक असा नैसर्गिकतेने संपन्न झालेला देश आहे ज्या देशातील लोक जगात सर्वात सुखी समाधानी म्हणून ओळखले जातात. असा आपल्या शेजारील देश आहे ज्याला जगातील इतर देशातील पर्यटकांना येण्यासाठी खर्चिक मानले जाते.कारण परदेशी पर्यटकांना एका दिवसासाठी हा देश २५० डॉलर एवढी रक्कम आकारली जाते. एवढी रक्कम आकारण्याचे कारण असे आहे कि परदेशी पर्यटक जे काही प्रदूषण करतात त्याचा संयम ठेवण्यासाठी एवढी रक्कम त्यादेशात आकारली आहे. एवढी फीस कोणत्याच देशात आकारली जात नाही.

आपण सर्वानी अंदाज लावला असेल तर समजलंच असेल कि हा देश म्हणजे भूतान आहे. आणि या देशात प्रवेश करायला आपल्या भारतीय लोकांना मात्र सूट दिलेली आहे. जगभरातील लोकांचे आकर्षण असलेला हा भूतान देश छोटा म्हणजे फक्त ७ लाख ९९ हजार संख्या असणारा देश आहे. या देशात प्रचंड नैसर्गिक संपन्नता आहे. वेगवेगळ्या नदी जंगले प्राणी हे या देशातील आकर्षण आहे.

आहे त्या गोष्टीत समाधान मानणारे या देशात लोक आहेत. त्यामुळे यादेशात अजूनही आधुनिक तंत्रज्ञान म्हणावे तसे आलेले नाही उलट येथील लोकांनीच ते नाकारलेले आहे.भूतानच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला भारत व उत्तर दिशेला चीन आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती सोबत मिळता जुळता हा देश आहे. या देशात अजूनही राजेशाही पद्धती आहे. पण हा राजा लोकांवर कोणत्याही प्रकारचे वाईट बंधने लादत नाही. राजा आणि भूतानी संसद या देशातील कार्यभार पहाते.

भूतान मध्ये आपल्याला तेथील हजारो वर्ष अजूनही जपलेल्या संस्कुर्ती ला पाहता येईल. तिथे आपल्याला ट्रेकिंग करण्यासाठी अनेक ठिकाण आहेत. भारतीयांना याठिकाणी अत्यंत कमी खर्च लागतो. त्यामुळे आयुष्यात एक वेळ या ठिकाणी जाऊन या देशातील समाधानी लोक कसे आहेत हे पाहणे गरजेचे आहे. आपल्या देशाच्या जवळ असणारा देश आहे त्यामुळे आपण दुर्लक्ष करू नये.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *