स्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर ! अशाप्रकारे मिळवा ५ लिटर पेट्रोल मोफत..

स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या धमाकेदार ऑफर देत असते. अशीच एक धमाकेदार ऑफर पुन्हा एकदा एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अगोदरच महागाईने त्रस्त असलेली सामान्य जनता पेट्रोलच्या भाववाढीने अधिकच त्रस्त झाली आहे. पण एसबीआयच्या ग्राहकांसाठी मात्र एक खुशखबर दिली आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरल्यास ग्राहकांना 5 लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. ही ऑफर कशी मिळवायची जाणून घेऊया..

अशाप्रकारे मिळवा पेट्रोल मोफत-

मोफत पेट्रोल मिळवण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणे बंधनकारक आहे. सोबतच तुम्हाला पैसे देताना भीम ऍपचा वापर करून एसबीआय बँकेतून व्यवहार करावा लागतो. एबीआयने आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 100 रुपयांचं पेट्रोल भरावं लागेल. त्यानंतर भीम अॅपद्वारे केलेल्या या 100 रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून 9222222084 या नंबरवर एसएमएस करायचा आहे. भीम अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यानंतर पेमेंट नंबर < UPI Reference No. (12-Digit) > < DDMM > टाईप करून 9222222084 या फोन नंबरवर SMS पाठवा.त्यानंतर तुम्ही लकी ग्राहक असाल तर तुम्हाला SMS द्वारे कळवले जाईल.

अशाप्रकारे तुम्ही 400 रुपये कॅशबॅक म्हणजेच जवळपास 5 लिटर पेट्रोल मोफत मिळेल. 23 नोव्हेंबर 2018 पर्यंत ही ऑफर सुरू असणार असल्याचे एसबीआयने सांगितले आहे. याद्वारे एकप्रकारे डिजिटल व्यवहारांना चालना मिळणार असून आणि भीम अॅपच्या युजर्सची संख्या वाढविण्यासाठी मदत या योजनेतून मिळणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *