पोटाची चरबी कमी करण्यासाठीचे हे ५ घरगुती उपाय..हमखास फायदा होतोच

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे आपण केल्यास हमखास आपल्याला फायदा होतोच.वजन वाढलेले दर्शविणारी गोष्ट म्हणजे पोट तर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्याला हे काही घरगुती उपाय करायचे आहेत.वजन कमी करायचे असल्यास आपल्यातील आळस काढून टाकणे महत्वाचे आहे. आळस काढून आपण नेहमी उत्साही राहिला तर आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे राहील.व वजन कमी करायचे उपाय हि आपण उत्सहात करणार..तर चला आपण अगदी साधे सोपे घरगुती उपाय पाहूया ज्याने आपल्या पोटावरील चरबी कमी होईल.

१. कमी प्रमाणात खा : जर तुम्हाला एकादाच भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोडं-थोडं खा.

२. गरम पाणी : पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे. यामुळे कॅलरीज कमी होतात. गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने ते आरोग्यासाठी आणखी लाभदायक ठरतं.

३. मॉर्निंग वॉक : पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करा यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

४. योग : योगा केल्याने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.

५. रात्री उशिरा जेवू नका : रात्री उशिरा जेवन करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवा. रात्रीचं जेवन खूपच लाइट असावं. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *