कॉमेडीकिंग कपिल शर्माची गर्लफ्रेंड बघितली का? लवकरच अडकणार विवाहबंधनात..

आपल्या खास अंदाजात लोकांना पॉट धरून हसायला लावणारा स्टार कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला कपिल शर्मा मधल्या काळात थोडा कॉमेडीपासून भरकटलेला बघायला मिळाला. कपिल मध्यंतरी अनेक वादात अडकला, ज्याचा थेट परिणाम त्याच्या करिअरवर झाला. आपल्या शो मधील सहकलाकारासह झालेला वाद असो वा चॅनेलसोबत झालेले वाद. यामुळे त्याच्या प्रसिद्ध द कपिल शर्मा शो गुंडाळावा लागला. पण आता नव्याने हा शो चालू होणार असल्याची बातमी असताना कपिल शर्मा आपल्या चाहत्यांसाठी एक गॉड बातमी घेऊन आलाय. कपिल शर्मा लवकरच आपल्या गल्रफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. जाणून घेऊया त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल..

कोण आहे कपिल शर्माची गर्लफ्रेंड?

कपिल शर्मा हा सध्या वयक्तिक जीवनात व्यस्त आहे. कुटुंबाला वेळ देण्याबरोबर आपली गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीतही तो सध्या व्यस्त आहे. कपिल शर्माने मागच्या वर्षी आपल्या नात्याची कबुली दिली होती. गिन्नी चतरथ हिच्यासोबतचे आपल नातं असल्याच कपिलने मान्य केल होत. तिच्यासोबत बराच वेळ घालवल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच वर्षी कपिल शर्मा आणि गिन्नी हे विवाहबंधनात अडकणार आहेत. तशी कपिल शर्माच्या कुटुंबाची देखील इच्छा आहे.

१२ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार?

कपिल शर्मा हा त्याची गर्लफ्रेन्डं गिन्नी चतरथ हिच्यासोबत १२ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार असल्याचे कळते. याबाबत अधीकृत माहिती नसली तरी हा विवाहसोहळा पंजाबमध्ये पार पडणार आहे. गिन्नी हि तिच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या घरी म्हणजेच जालंधरमध्ये विवाहसोहळा पार पडेल.

जालंधरमध्ये मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. कपिलला साध्या पद्धतीने लग्न करायचे होते पण गिन्नी एकुलती एक असल्याने तिच्या आईचे इच्छेने लग्न मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. पंजाबी रितीरिवाजानुसार हे लग्न होणार आहे. येत्या १० तारखेपासून या लग्नाचे विधी सुरू होऊन ते ४ दिवस चालतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *