खूप वेळा बघितला असेल तुम्ही हा प्रचंड व्हायरल फोटो, जाणून घ्या या फोटोतील ही व्यक्ती आहे तरी कोण?

सोशल मीडिया आता नवनवीन गोष्टी माहिती करण्याचा एक प्लॅटफॉर्म बनला आहे. बऱ्याचदा काही गोष्टी चांगल्या आणि नाविन्यपूर्ण गोष्टी माहिती होतात तर खोटी माहिती देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आलेली असते. मागील काही दिवसांपासून असाच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये एक महिला उभी आहे. ती कपडे काढत आहे किंवा घालत आहे. तिच्या समोर दोन पुरुष उभे आहेत. आजूबाजूला काही पोस्टर्स ठेवण्यात आलेले आहेत. या फोटो विषयी सांगण्यात आले आहे की 50 च्या दशकात अशाच प्रकारे स्त्रिया या ऑडिशन करत असायच्या. स्त्रियांना डायरेक्टर समोर कपडे काढावा लागायचे. तोकडे कपडे देखील घालावे लागायचे आणि अजूनही बऱ्याच गोष्टी कराव्या लागायच्या. अशावेळी गरजेपेक्षा जास्त गोष्टी बोलल्या जातात.

या फोटोमधील व्यक्ती कोण आहे?

पण मनात विचार आला की हे खरं आहे का तर उत्तर मिळाले हो. ते असे झाले की तो फोटोमध्ये दिसणारा डायरेक्टर जो आहे त्याचे नाव समजले. फोटोमध्ये जे डायरेक्टर आहेत त्यांचं नाव आहे अब्दुल रशीद कारदार. विशेष म्हणजे ते पाकिस्तानचे पहिले टेस्ट कॅप्टन अब्दुल कारदारचे सावत्र भाऊ होते.

अब्दुल रशीद कारदार यांनी कारदार प्रोडक्शन नावाने एक प्रोडक्शन हाऊस बनवले होते. त्यांनी कारदार स्टुडिओ बनवला आणि छानपैकी सजवला. बोलले जाते की कारदार स्टुडिओ असा स्टुडिओ होता जिथे मेकअप रूममध्ये देखील एसी होता.

हे तेच अब्दुल रशीद कारदार आहेत ज्यांनी केएल सेहगल यांच्यासोबत शाहजहां सिनेमा बनवला होता या सिनेमातील गाणे खूप गाजले होते. हा सिनेमा सुपरहिट झाला होता.

अब्दुल रशीद कारदार यांचा जन्म भारतातल्या त्या भागात झाला होता जो पुढे पाकिस्तानचा हिस्सा बनला. 1920 च्या दशकात रेल्वे मध्ये नोकरीला असलेल्या जिके मेहता यांनी कारदार यांना असिस्टंट म्हणून संधी दिली. कारदार पूढे असिस्टंट डायरेक्टर बनले आणि त्याच सिनेमात त्यांनी अभिनय देखील केला.

कारदार यांनी स्टुडिओमध्ये बोलावून कपडेच उतरवले असे नाही तर त्यांनी इंडस्ट्रीला चांगले कलाकार देखील मिळवून दिले. कारदार यांनी नौशाद यांना अनेक संधी दिल्या. मोहमद रफी यांचे पहिले हिट गाणे ‘सुहानी रात ढल चुकी’ हे देखील कारदार यांच्या दुलारी मध्ये गायले होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *