जन्मठेपेची शिक्षा झालेला व्यक्ती 14 वर्षातच बाहेर येतो का?

जन्मठेपेच्या शिक्षेबद्दल आपल्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत. अनेकांना वाटते की जन्मठेपेची शिक्षा म्हणजे एका निश्चित काळासाठी जेल. जसे की 14 वर्षे किंवा 20 वर्षासाठी जेल. आणि कैद्यांचे दिवस आणि रात्र वेगवेगळे मोजले जातात याबद्दल देखील लोकांना माहिती नाहीये. असाही समज आहे की कैद्यांची रात्र आणि दिवस हे वेगवेगळे मोजले जातात. म्हणजेच एखाद्याला 14 वर्षाची सजा सुनावण्यात आली तर तो कैदी हा अवघ्या 7 वर्षात जेलमधून बाहेर येतो. पण या गोष्टींमध्ये खरंच काही तथ्य आहे का? खासरेवर जाणून घेउया याबद्दल माहिती..

सर्वात पहिले आणि महत्वाचे म्हणजे दोषीला जन्मठेप सुनावण्यात आली तर त्याला आपले राहिलेले आयुष्य हे जेलमध्येच घालावे लागते. याबद्दल सुप्रीम कोर्टाने देखील अनेक वर्षांपासून असलेली शंका दूर केली असून कोर्टाने म्हंटले आहे की जन्मठेप झालेल्या व्यक्तीला 14 वर्ष किंवा 20 वर्षे जेलमध्ये पूर्ण झाल्यानंतर बाहेर येण्याचा अधिकार आहे अशी लोकांमध्ये धारणा आहे. पण असा कोणताही अधिकार कैद्यांकडे नसून सरकारने कैद्याला काही माफी नाही दिली तर त्या कैद्याला आपल्या शेवटच्या घटके पर्यंत जेलमध्येच राहावे लागते. म्हणजे सरकारने जन्मठेप झालेल्या कैद्याला काही सूट देण्याचे ठरवले तरच तो बाहेर येऊ शकतो. आणि सरकारने सूट दिली तरीही कैद्याला कमीत कमी 14 वर्षे जेलमध्ये राहवेच लागते.

कैद्यांचे रात्र आणि दिवस वेगळे मोजले जातात यात पण काही तथ्य नाहीये. कैद्याला कमीत कमी 14 वर्षे जेलमध्ये राहणे अनिवार्य आहे. आणि सरकार म्हणजे केसनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना यामध्ये अधिकार असतात.

सामान्य लोकांमध्येच हे गैरसमज ना राहता ते कोर्टामध्ये देखील पोहचले होते. कोर्टामध्ये सुद्धा गैरसमज असल्याने सुप्रीम कोर्टाला याबद्दल माहिती द्यावी लागली. यामुळेच आता कोर्टात जन्मठेपेची शिक्षा सूनवल्यानंतर मरेपर्यंत जन्मठेप असा उल्लेख केला जातो.

कोर्टाला वाटते की कैद्याने काही वर्षे जेलमध्ये घातल्यानंतर तो सामान्यपणे जीवन जगण्याचा प्रवाहात येऊ शकतो. त्यामुळे आजन्म जन्मठेप असली तरी त्यात माफीची मुभा देण्यात आलेली आहे. आणि महत्वाचे म्हणजे कोर्टाला माफी देण्याचा अधिकार नाहीये.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *