नागपूर विमानतळावर बाळासाहेबांवर झालेला जीवघेणा हल्ला आणि त्यांनी सिनेस्टाइल केलेला राडा..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील अनेक अविस्मरणीय प्रसंगाबद्दल आपण वाचले असेल. पण त्यांच्या जीवनातील असा एक थरारक प्रसंग आहे की जो वाचून बाळासाहेब ठाकरे फक्त भाषण च करत नव्हते तर वेळ पडली तर ते हात चालवू शकतात हे दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कोणाला मारहाण केली असेल याबद्दल आपल्याला माहिती नसेल पण असा एक प्रसंग आहे. जो वाचल्यावर बाळासाहेब ठाकरे चा वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळेल.

बाळासाहेब ठाकरे आणि कम्युनिस्ट कामगार चळवळीची दुश्मनी ही सर्वाना परिचयाची आहे. मुंबई मध्ये बाळासाहेब ठाकरे व त्यांचे नेहमी खटके उडायचे. असाच एक प्रसंग आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरे हे भाषणाच्या निमित्ताने नागपूर ला येणार होते. हा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने ठेवलेला होता. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे रेल्वेने मुंबईहून 10 बॉडिगार्ड घेऊन गेले त्यावेळी कम्युनिस्ट संघटनेच्या लोकांनी घोषणा केली की बाळासाहेब ठाकरे हे जर नागपूरला आले तर जिवंत वापस जाणार नाहीत.

बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या धमक्यांना त्यांनी भीक घातली नाही.रात्री नागपूर ला ते रेल्वे स्टेशन वर पोहचयाच्या अगोदरच नागपूर येथील आयोजकांनी त्यांना वर्धाहून रात्री उतरवून मोटारी ने नागपूर ला आणले. नागपूर मध्ये त्यांनी कार्यक्रमात तडाखेबंद भाषण केल्यानंतर रात्री मुंबईसाठी निघण्याची तयारी केली तेव्हा त्यांना पोलीस संरक्षणात नागपूर विमानतळावर सोडण्यात येत होते. अमरप्रेम हॉटेल हा कम्युनिस्टांचा अड्डा होता. याठिकानाहून बाळासाहेब ठाकरे यांचा ताफा गेल्याने कम्युनिस्टांना समजून गेले की बाळासाहेब ठाकरे जात आहेत.

विमानतळावर बाळासाहेब ठाकरे पोहचल्या नंतर बुकस्टॉल जवळ नागपूर च्या आयोजक देवधर शी ते बोलत होते तेव्हा 10 ते 12 लोक बाळासाहेब यांच्या जवळ येऊन त्यांना घेरले. त्यावेळी त्यांचे अंगरक्षक 10 फुटाच्या अंतरावर होते बाळासाहेब एकटेच त्यांच्या गराड्यात होते. त्यापैकी एकजण त्यांना म्हणाला ‘आपसे हमे बात करना है’ असे तो म्हणल्यावर त्यांनी देवधर यांना विचारले की कोण आहेत हे लोक तेव्हा देवधरने कोड भाषेत इशारा करून सांगितल्या नंतर..माझी तुम्ही वेळ घ्या, आपण जरूर बोलूया आता मला वेळ नाही.. असे बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर तो माणूस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बोलला आपको अभी बात करनी पडेगी.. बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचा अंदाज येऊन गेला.. त्याचे बोलणे संपेपर्यंत बाळासाहेबानी सफारीच्या खिशात हात घालून पिस्तुल बाहेर काढले आणि त्याला कळायच्या अगोदर पिस्तूलाच्या दस्त्याने बाळासाहेबांनी त्या माणसाचे तोंड नाक कान फोडून टाकले.. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या तो मोठ्याने ठाकरे ने मुझे मारा म्हणाला हे ऐकून अंगरक्षक गुप्त्या काढून धावत येऊन त्या लोकांच्यावर हल्ला केला..

ते सर्व लोक घाबरून गेले कारण असा प्रसंग त्यांना घडेल असे वाटले नाही एक सहकारीचे तोंड रक्तभंबाळ होऊन पडलाय तर त्यात अंगरक्षकांचा हल्ला सर्व जीव मुठीत धरून पळून गेले.. ती लोक बाळासाहेब ठाकरे यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने आली होती पण बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच त्यांना फटकावून त्यांचा प्लॅन उधळून लावला.. नुसते भाषण च नाही तर ते चार हात करायला ही मागे पुढे नव्हते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *