या विश्वासू मुसलमानाने वाचवले होते महाराणा प्रताप यांचे प्राण..

कमी सैन्य असूनही अकबराच्या विरोधात लढलेले महाराणा प्रताप यांनी शत्रूच्या विरोधात कधीच आपली मान झुकवली नाही. महाराणा प्रताव यांचे जेवढे किस्से प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे त्यांचा खास घोडा चेतकचे सुद्धा किस्से प्रसिद्ध आहेत. महाराणा प्रताप आपल्या दोन हातात भाले घेऊन विरोधी सैन्यावर अक्षरशः तुटून पडत. त्यांच्या हातात एवढं बळ होतं की ते दोन दोन सैनिकांना एकाच वेळी पराजित करायचे. मेवाडचे लोक आजही सकाळी उठल्यानंतर देवी देवता ऐवजी महाराणा प्रताप यांना प्रार्थना करतात. खासरेवर जाणून घेऊया महाराणा प्रताप यांचे काही अपरिचित किस्से..

विश्वासू मुसलमानाने वाचवले होते महाराणा प्रताप यांचे प्राण-

1576 मध्ये महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध झाले होते. अकबराच्या सैन्याचे नेतृत्व मानसिंह करत होते. मानसिंहसोबत 10 हजार घोडेस्वार आणि हजारो सैनिक होते. तर महाराणा प्रताप यांच्याकडे अवघे 3 हजार घोडेस्वार आणि मोजकेच सैनिक होते. मानसिंहने यावेळी महाराणा यांच्यावर खूप जोरात वार केला पण तो महाराणा प्रताप यांच्या सैन्यातील विश्वासू हकीम खान सूर ने आपल्यावर घेतला आणि त्यांचा जीव वाचवला. त्यांचे इतर काही बहादूर सैनिक जसे की भामाशाह आणि झालामान हे सुद्धा युध्दादरम्यान महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवताना शाहिद झाले होते.

सर्वच जनता होती महाराणा प्रताप यांची सेना-

महाराणा यांचं पालन पोषण भीलांच्या कुका जातीने केलं होतं. ते राणांचे सर्वस्व होते. अकबराच्या विरोधात भीलांनी चांगलेच युद्ध केलं होते. या सैन्याच्या मदतीने महाराणा प्रताप यांनी अकबरकडून शेजारचे दोन राज्य जिंकले होते. राज्यातील सर्व जनता महाराणा प्रताप यांची सेना होती.

महाराणा प्रताप यांच्या होत्या 11 पत्नी-

महाराणा प्रताप यांच्या 11 पत्नी होत्या. महाराणा प्रताप यांच्या मृत्यूनंतर सर्वात मोठ्या राणी महाराणी अजाब्दे यांचा मुलगा अमरसिंह पहिला राजा बनला होता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *