‘ड्युरेक्स’ने रणवीर-दीपिकाला दिलेल्या हटके शुभेच्छा बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही..

बॉलिवूडमधील सध्याचे सर्वात टॉपचे सेलिब्रेटी कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बुधवारी (दि.१४) इटलीत मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकले. इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी राजेशाही थाटात पारंपरिक कोकणी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. लग्न पार पडल्यानंतर दोघांनी २४ तासानंतर स्वतः दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. तेव्हापासुन त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे.

रणवीर दीपिकाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असताना त्यांना चाहते शुभेच्छा तर देत आहेत पण मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केले जात आहे. दीप-वीरच्या लग्नाचे भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रणवीर आणि दीपिकाने सोशल मीडियावर हे फोटो टाकताच क्षणार्धात ते व्हायरल झाले. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम सगळीकडेच या फोटोंची चर्चा होती. अनेक नेटिझन्सनी पोस्ट केलेले मिम्स तुम्हाला पॉट धरून हसायला भाग पाडतील. पण यामध्ये ड्युरेक्सने देखील उडी घेतली असून त्यांनी रणवीर दीपिकाला दिलेल्या हटके शुभेच्छा देखील तुम्हाला हसायला भाग पाडतील.

कंडोमचा ब्रँड असलेल्या ‘ड्युरेक्स’ कंपनीने रणवीर दीपिकाला सोशल मीडियावर पोस्ट करून या शुभेच्छा दिल्या आहेत. हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. रणवीर सिंग हा ड्युरेक्सचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्यामुळे त्याला शुभेच्छा देताना ड्युरेक्सने अतिशय मजेशीरपणे जाहिरात देखील केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी रणवीर आणि दीपिकाच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ड्युरेक्सने सोशल मीडियावर दिलेल्या शुभेच्छांचे ट्विट –

ड्युरेक्सने यापूर्वीही विराट कोहली- अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर- आनंद अहुजा या जोडप्याना हटके शुभेच्छा दिल्या होत्या. ज्या इंटरनेटवर चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *