दीपिकाच्या लग्नातील साडीवर असे काय लिहिलेले होते ज्याची सर्वत्र होतेय चर्चा?

बॉलिवूडमधील सध्याचे सर्वात टॉपचे सेलिब्रेटी कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बुधवारी मोठ्या थाटात लग्नबंधनात अडकले. इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या ‘विला डेल बालबिअॅनेलो’ (villa del balbianello) या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये दीपिका आणि रणवीर यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीन शाही विवाहसोहळा काल पार पडला. रणवीर सिंग हा सिंधी आहे त्यामुळे त्यांनी काल सिंधी पद्धतीने सुद्धा लग्न केलं.

या विवाह सोहळ्याला रणवीर आणि दीपिका यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे ४० पाहूणेच होते. लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला होता. 23 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

रणवीर आणि दीपिका हे मागील पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. संजय लीला भन्साळींच्या रामलीला सिनेमाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी बाजीराव मस्तानी सिनेमात देखील सोबत काम केले.

रणवीरने लग्नात तुने मारी एंट्रीया या गाण्यावर डान्स करत एन्ट्री मारल्याचे कळते. तसेच गुडघ्यावर बसून दीपिकाचा हाथ हातात घेऊन तिला अंगठी घातली.

लग्नाचे फोटो बघण्यासाठी अनेकांना उत्सुकता होती. रणवीर आणि दीपिकाने दोन दिवसांनी लग्नाचे फोटो पोस्ट केले. त्यांनी लग्नात कोणता पोशाख परिधान केला याची उत्सुकता सर्वांनाच होती. दीपिकाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. तसेच या शाही पेहरावावर तिने दुपट्टा घेतला होता.

पण याव्यतिरिक्त दीपिकाच्या साडीची अजून एका गोष्टीमुळे खूप चर्चा होत आहे. ती म्हणजे दीपिकाच्या दुपट्ट्यावर प्रिंट करण्यात आलेला सुभाषित मजकूर.

दीपिकाच्या साडीवर ‘सदा सौभाग्यवती भव:’ हे सुभाषित प्रिंट करण्यात आलेले होते. काही चाहत्यांनी हे सुभाषित खूप आवडल्याचे ट्विट करून सांगितले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *