शिवसेना आमदार तानाजीराव सावंतांना शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..

नमस्कार सप्रेम जय महाराष्ट्र..,
प्रति तानाजीराव सावंत..,
—- खरंतर सावंत आडनावासमोर साहेब असं लिहीनार होतो परंतु गेल्या काही दिवसांपासूनची तुमची वर्तनं आणि तुमचा सत्तेचा आलेला अहंकार पाहता जे लिहीलंय तेच खुप सन्मानजनक आहे..
मराठवाड्यातील कालभैरवनाथाच्या पवित्र आणी पावन अशा नगरीत आपण एक सहकारी साखर कारखाना चालविता तिथलं राजकारण हाताळता मात्र तिथ राहुनही नाथांच्या नगरीत वास्तव असुनही आपल्यामध्ये सद्गुणांचा लवलेश ही जाणवत नाही.. एकाद्या जंगलात एखादा हत्ती माजावा आणि त्यानं अख्खं जंगल माझ्या बापाचं आहे या राणाभिमदेवीथाटात अख्ख्या जंगलात धुडगूस घालावा तसं तुमचं वागणं बनलंय.. आपण ज्या शेतकर्यांच्या जिवावर जगतोय ज्यांच्या जिवावर तुमच्या घरात मुलंबाळं भाकरी खातात.. (त्यातल्या त्यात तुमची मुलंबाळं तर सोन्याचा घास खातायंत म्हणे…. असो…) तुम्ही मात्र त्याच बळिराजावर तुमच्या कारखान्यावर आंदोलन करित आहात म्हणून डायरेक्ट ट्रॅक्टरंच घातलात..

ध्यानात ठेवा सावंत तुमचे दिवस भरलेत.. तुम्ही साक्षात बळिराजाला ललकारले आहे.. या जगाचा पोशिंदा अवघ्या जगाची भुक भागवुन लहानथोरांची मनं त्रुप्त करनारा माझा शेतकरी राजा तेव्हा स्वतःच्या हक्काच्या ऊसदराचे राहीलेले प्रतिटन चारशे रूपये प्रमाणे रक्कम द्या अशी आर्त हाक तुम्हाला देत होता.. तेव्हा तुम्ही त्याचे अश्रु पुसणे तर सोडाच पण ज्या कर्त्या व्यक्तींवर त्यांचे घरदार चालते अशा चार शेतकर्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालुन तुम्ही कोनतं पुण्य प्राप्त केले हे नाथ जाणे..
सावंत आपल्या कार्याची लिलया अगाध आहेत आपल्या श्रीमंतीच्या माजापायी आपण महाराष्ट्रातील तमाम मायबाप शेतकर्यांना भिकारी बनवनार होतात.. कष्टकरी दिन दलित गोरगरिब हे कष्ट करून घाम गाळुन दररोज कष्टाची भाकरी खातात त्या भाकरीला स्वाभिमान असतो आणि तुम्ही त्यांचेच पात्र कोरडे करावयास निघालात… शिवजलक्रांती नावाची योजना आणुन भैरवनाथच्या सात युनिट मधुन मिळविलेली मलई आपण थोडीफार पब्लिसीटीसाठी घालवलीत… तालुक्यातील जनतेला मोफत साखर दिली खरी पण चार किलो साखरेच्या नावाखाली पाच लाख मेट्रिक टनाचे प्रत्येक टनाला चारशेरूपये प्रमाणं हाणलंत.. हे म्हणजे घ्यायचं पातेल्यानं अनंत द्यायचं चमच्यानं.. आणि हो चमच्यांवरून ध्यानात आलं..

तुमचे काही पंढरपूरातील चमचे जे तुमच्या ऐश्वर्यावर रूबाब करतात अशांनी आमच्या खासदार राजु शेट्टी साहेबांचा पुतळा वगैरे जाळन्याचे निर्लज्ज कृत्य केलं.. मुळात जाळनार्यातील एकजण तरी कधी कुठल्या आंदोलनात सामाजिक कार्यात अथवा कुठल्याही सत्कार्यात सहभागी दिसला आहे का.. आजवर कारखानदारांच्या ताटाखालचं मांजर हीच प्रतिमा इथल्या शिवसेनेची झालिय.. हेच का बाळासाहेबांचे शिवसैनिक हे विचारन्याची आता वेळ आलिय… बाळासाहेबांनी जो स्वाभिमान शिकवला तो स्वाभिमान विसरून हे सैनिक कारखानदारांचे प्यादे झालेत… असो..
सावंत आपण एवढी मर्गुरी आणि मस्ती दाखवन्याचे कारण म्हणजे आपल्याकडे असनारा पैसा.. तो ही किती प्रामाणिकपणा मुळे आलाय हे सर्व जनतेस ठावुक आहे म्हणून तर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला लोक कधी जनतेतुन निवडुन देत नाहीत.. कारण तुमची तेवढी औकात नाही हे जनतेला ठावुक आहे.. माढ्यातील जनतेने ओळखले म्हणुन तुम्ही तुमचा मोर्चा परांड्याला वळविला तिथं ही तुम्हाला जनता कोलतेय.. तिथला सामान्य व सच्चा शिवसैनिक तुमच्या विरोधात आहे…

आपण मराठा समाजातील बलिदान देनार्या कुटुंबीयांना एक लाख रूपये देन्याचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे परंतु नाण्याची दुसरी बाजु अशीही आहे की आपल्या संपुर्ण राज्यामध्ये JSPM नावाने शिक्षण संस्था आहेत.. शासननिर्णयाप्रमाणे आपण मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांची पन्नास टक्के फी माफ करने व ती फी परत देने बंधनकारक असताना आपण तिही दिलेली नाही असा ही प्रकार समोर आला आहे शिवाय आपली तिथेही दादागिरी आहेच त्यामुळे सर्व माहित असताना सुध्दा तेथिल मुले गप्प आहेत…
सावंत ही जनता गरीब आहे पण लाचार नाही सामान्य नागरिकांना जर तुम्ही स्वतःच्या घरचे नोकर समजत असाल तर ध्यानात ठेवा हिच जनता ज्याला उचलुन खांद्यावर घेते तिचं जनता तुम्हाला जनता तुम्हाला आगामी काळात तुम्हाला पायाखाली पायदळी तुडविल्याशिवाय राहनार नाही.. आणि तुमच्या जिभेमधुन निघनारा वाचाळवीरपणा जर असाच चालु राहिला तर तो दिवस सुध्दा तुमच्यासाठी लांब नसेल…

सावंत आपण खासदार साहेबांना उद्धट्टपणे बोललात आपण आपल्या अंगातील मर्गुरी व मस्तीचे ओंगळवाने प्रदर्शन आपण त्या निमित्ताने दाखवले… आपण कोन आहात आपली लायकी काय हे आपण कदाचित आपण विसरले आहात पण ध्यानात ठेवा राजु शेट्टी हे एक असे लोकप्रतिनिधी आहेत जे आजवर प्रत्येक निवडणुकीत शेतकर्यांनी व कष्टकर्यांनी दिलेल्या पैशावर निवडणुका लढवल्या आहेत आणि विक्रमी मताधिक्याने जिंकल्या आहेत ते ही एवढी मोठी साखरसम्राटाची फौज उभी असताना… मग सावंत तुम्ही किस झाड की पत्ती आणि तुम्ही आमदार हे मागिल दारातुन निवडुन आला आहात.. एकाएका मतदाराला तुम्ही पैशात मुजविले इतके पैसे आपण वाटप केले याचीच चर्चा सर्व विदर्भात होती हे म्हणजे असं झालं पदासाठी कायपण म्हटल्यासारखी तुमची अवस्था…

ध्यानात ठेवा राजु शेट्टींवर टिका करणे म्हणजे सुर्यावर थुंकन्यासारखं आहे… अनेक धक्के आले टिकाटिपण्ण्या झाल्या, वादळं आली पण राजु शेट्टी नावाचा हा शेतकरी राजाला न्याय देनारा वटवृक्ष अजुनही तसाच भक्कमपणे उभा आहे नव्हेनव्हे तर या वटवृक्षाच्या फांद्या अन् त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पारंब्या राज्यातचं नव्हे तर संपूर्ण देशात पसरलेल्या आहेत.. आणि तुम्ही आहात की तुम्हाला तुमच्या सोनारी या गावातील ग्रामपंचायत ही राखता आलेली नाही…
राजु शेट्टी हे शेतकरी मसिहा आहेत त्यांच्यासाठी तुमच्या सारखे शत्रु किरकोळ आहे.. शेतकरी प्रश्नांवर संपुर्ण देशाचा पंतप्रधान असनार्या नेत्याशी वैर घेनार्या राजु शेट्टींपुढे तुम्ही म्हणजे टवकासुध्दा नाहीत…
सावंत तुम्ही ज्यांच्यासमोर आपली मस्ती दाखवलीत ते राजु शेट्टी हे शेतकरी व कष्टकरी व बळिराजासाठी नव्या युगाचा सुर्योदय घेवुन आलेले सुर्य आहेत आणि तुम्ही म्हणजे त्या तळपत्या सुर्यापुढे कधितरी चमकनारे काजवे… काजव्यांच्या लुकलुकन्याने सुर्यावर डाग पडत नसतो तो तशीचं उर्जा देत असतो अगदी तेजस्वीपणे…

कळावे आपलाच…
रणजित बागल, मु.पो.गादेगाव ता. पंढरपूर जि.सोलापूर

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *