सरकारी नौकरीचे फायदे म्हणून तुम्ही याला करताय ट्रोल बघा हा कोण आहे…

सध्या या तरुणाचे बरेच फोटो सोशल मिडीयावर वायरल झाले आहे. आणि त्यावर अनेक लोक टिंगल टवाळ्या करताना दिसतात. सरकारी नौकरीचे फायदे वैगेरे शीर्षके देऊन हे फोटोस फिरवण्यात येत आहे. तर हा तरून कोण आहे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का ?

तुम्ही वाचून थक्क होसाल कि हा अगदी कमीवयाचा तरूण एक अफ्जाधीश आहे. आणि हा सर्व पैसा त्याने स्वतः कमावला आहे.
या तरुणाचे नाव आहे अॅटली कुमार २९ वर्षीय दाक्षिणात्य सिनेमा निर्माता

एवढ्या कमी वयात त्याने मोठी जवाबदारी पेललेली आहे आणि तो त्यात मोठ्या प्रमाणात यशही मिळवत आहे. २०१६ साली सर्वात मोठा सुपर डुपर हिट देणारा निर्माता अॅटली कुमार आहे. त्याला लोक राजा रजनी ह्या प्रसिद्ध चित्रपटाकरिता ओळखतात. चला काही अश्या गोष्टी आता खासरे वर पाहूया ज्या अॅटली कुमार विषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
अॅटली कुमारचे खरे नाव अरुण कुमार आहे. लहानपणी लोक त्याला प्रेमाने अॅटली म्हणायचे पुढे चालूनही त्याने ते नाव स्वतः सोबत जोडून घेतले.

अॅटली कुमार याचा जन्म मदुराई येथे झाला होता. त्यानंतर तो चेन्नई येथे बालपणीच राहण्यास आला. त्याचे संपूर्ण शिक्षण चन्नई येथे झाले. त्याने निर्माता होण्याकरिता चेन्नई येथील सत्यभामा विद्यापीठात Visual Communication ची पदवी घेतली.

लहानपणापासून तो दाक्षिणात्य सिनेमाचा चाहता होता आणि त्याचा आवडता अभिनेता रजनीकांत आहे. पदवी पूर्ण झाल्या नंतर अॅटलीने आपल्या मित्रासोबत काही Short Film सुध्दा बनविल्या. त्याची एक short film ‘Mugaputhagam’ युट्यूबवर खूप प्रसिद्ध आहे..

अॅटलीने आपल्या करीयरची सुरवात दक्षिण सिनेमातील नामवंत निर्माता शंकर याच्या सोबत केली. निर्माता शंकर सोबत त्याने ५ वर्ष काम केले यामध्ये त्याने रजनीकांत याची रोबोट सारख्या मोठ मोठ्या सिनेमात सहायक निर्मात्याचे काम केले.

दक्षिणात्य सिनेमातील नवीन सुपर डुपर हीट चेहरा शिवाकार्तीकेयन व अॅटली हे सिनेमात येण्या अगोदर पासून चांगले मित्र आहे. त्याने अॅटलीच्या अनेक short film मध्ये काम केलेले आहे. लवकरच तो त्याच्या सोबत सिनेमाही काढणार आहे.

अॅटलीचे लग्न नोव्हेंबर २०१४ मध्ये क्रिष्णप्रिया सोबत झाले. तो तिला ८ वर्षापासून ओळखत होता. विजया टीवीवरील एका सिरीयल मध्ये प्रिया काम करत होती. त्याच सोबत तिने अनेक कन्नड रिअलिटी शो मध्ये काम केलेले आहे. प्रियाने सिघम सारख्या प्रसिध्द तमिळ सिनेमात काम केलेले आहे.

दाक्षिण्यात्य सिनेमात त्याचा पहिला चित्रपट राजा रजनी सलग १०० दिवस सुपर हिट चालला. १५ कोटी बजेट असलेल्या सिनेमाने १०० करोड कमाविणारा पहिला दाक्षिणात्य चित्रपट. सध्या क्वालीवूडमध्ये ह्याला तोड नाही आहे.

ह्या आहे काही अॅटली कुमार विषयी न माहिती असलेल्या गोष्टी.. पुढील वेळेस अॅटली कुमारचे फोटो वायरल किंवा ट्रोल करण्या अगोदर हजार वेळेस नक्की विचार करा. माणसाची सुंदरता रंगावर नसून त्याच्या कामावर असते हे अॅटली कुमारने सिद्ध केले आहे.

लेख आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका. अनेक लोकांना अॅटली कुमार माहिती नाही त्यांना हि माहिती मिळेल. आणि जगाकडे काळा गोरा म्हणून बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर बदलला….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *