नोटबंदी तिला कळाली नाही, पैसा असूनही गेला जीव…

“आज एक गोष्ट तुम्हाला खासरे वर सांगणार आहो. लहान मुला मुलीना सांगणारी हि गोष्ट नव्हे. एक सत्य कथा आहे. या समजतील गोष्ट. नोटबंदीने अनेक लोकांना हलवून सोडले होते. परंतु एक वृध्द महिला अशी आहे जिला या विषयी माहितीच झाली नाही. त्यामुळे या वृद्धेचे ४ लाख रुपये निव्वळ कागदाचे तुकडे झाले आहे. तिने प्रत्येक जागेवर विनवणी केली आहे कि तिला नोट बदलून द्यावी परंतु तिला अजूनही प्रतिसाद मिळाला नाही. तिच्या जवळ बस तेवढाच पैसा होता ज्याच्यावर ती आयुष्य काढत होती. आता तिचा बिमारीने मृत्यू झाला परंतु या बिमारीत तिला स्वतःला लावायला पैसा नव्हता.”

केरळ मध्ये अर्नाकुलम जिल्ह्यातील हि गोष्ट आहे. सतीबाई त्या वृद्धेचे नाव केरळच्या पशु वैद्यकीय दवाखान्यात ती काम करत होती. २० वर्ष तिला रिटायर होऊन झाले. आता तीचे वय ७६ वर्ष झाले होते. मिळालेल्या पेन्शन ती जमा करून ठेवायची.

सतीबाईला एक मुलगी होती. तिच्या शिवाय तिला कोणीही नव्हते. तिच्या नवर्याचा मृत्यू फार आधी झाला. नवर्याशिवाय तिने संसाराचा गाडा चालविला. परंतु नशिबी काही वेगळच होत १ वर्षा अगोदर तिच्या मुलीचाही मृत्यू झाला. त्यानंतर तिची मानसिक स्थिती खालवली होती.

रिटायर झाल्या नंतर तिला १० लाख रुपये मिळाले त्यापैकी तिच्या जवळ ४ लाख रुपये बाकी होते. ती घरात एकटी राहत होती तिचे इतर लोका सोबत पटत नव्हते. तिला वाटायचे लोक तिचे पैसे चोरतील किंवा तिला फसवतील. खालावलेल्या मानसिक स्थ्तीतीत ती एकटी राहत होती.

आणि त्यानंतर झाला नोटबंदीचा निर्णय झाला व सामान्य लोकांना लाईन मध्ये लागायचं काम पडल. जिकडे तिकडे रांगाच रांगा एटीएम ते बँक सगळीकडे गर्दी झाली. हीच नोटबंदी ज्यामध्ये काळे धन बाहेर येईल हे मोदिनी सांगितले व किती काळे धन बाहेर आले ते सरकारलाच माहित. प्रत्येक वेळेस नोट बदलायला सरकार नियम बदलवत होते परंतु या सर्वापासून सतीबाई दूरच होती.

सतीबाई आपले आयुष्यातील एक एक दिवस काढत होती. जानेवरी २०१७ ला तिला हे सर्व कळाले. दुकानात गेली असता तिची ५००चि नोट दुकानदाराने घेतली नाही. हे ऐकल्यावर सतीबाई चिन्नभिन्न झाली. अनेक दुकाने ती फिरू लागली परंतु कोणीही नोट घेत नव्हते आणि नंतर तिला चिंता लागली घरात असलेल्या ४ लाख रुपयाची..

सतीबाई घरी आली आणि सर्व पैसा थैल्यात भरला आणि त्रिवेणा येथील स्टेट बँक गाठली. आणि बँकेतील मैनेजरला तिने हे सर्व रक्कम दाखवली व बदलून देण्याची विनवणी करू लागली. परंतु तिला बँकेतील अधिकार्यांनी सांगितले कि आता फक्त देशा बाहेरील लोकाची रक्कम बदलून भेटेल. बँकेतील अधिकार्यांनी तिला मदत करण्याकरिता बरेच पर्यंत केले पण काही फायदा झाला नाही.

गावातील पंचायत समिती सदस्य पोली टीपी हिने तिला घेऊन चेन्नई गाठले परंतु तिथे त्यांना सांगण्यात आले कि मंत्रालयातून परवानगी लागेल. त्यांनी मंत्रालय गाठले परंतु काहीही फायदा झाला नाही.

पोली टीपी यांनी सांगितले कि तिला हृद्य व किडनीचा आजार आहे. काही आठवड्या अगोदर तिला दवाखान्यात भरती करण्यात आले. अर्नाकुलम दवाखान्यात तिचा इलाज सुरु आहे परंतु चांगल्या उपचारा अभावी तिची प्राणज्योत १७ ऑगस्ट रोजी माळवली.

नोट बदलल्या गेले असते तर कदाचित वेगळी परिस्थिती राहिली असती. या उलट या काळात पोलिसांनी तिच्या घरावर छापा मारून सर्व जुन्या नोटा सील केल्या. सर्व नोटा ह्या प्लास्टिकच्या पिशवीत तिने कपाटात ठेवल्या होत्या. हि छापेमारी पंचायत समिती सदस्या पुढे झाली.

वृद्ध महिलेची हि गोष्ट नोटबंदी नावाने राहून गेली. माहिती नाही हि गोष्ट कोनि कोणाला सांगेल का नाही का ? जशी ती नोटबंदी पासून दुर्लक्षित राहिली तशेच तिची हि गोष्ट हि लोकापासून दूर राही. हि गोष्ट नक्की शेअर करा व कळूद्या काळ्या मोदींना काळ्या संपतीत तिचे हे पैसे जोडून घ्या. ती तर या जगात नाही राहिली….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *