या बॉलरची ऍक्शन बघून हसून हसून पोट दुखेल! अंपायरही गेले चक्रावून..

क्रिकेट खेळ हा एका ठराविक अंदाजात आजपर्यंत खेळलेला आपण बघत आलो आहोत. पण कधी कधी काही क्रिकेटपटू वेगळं काही तरी करण्यासाठी काही नवीन गोष्टी ट्राय करत असतात. यामध्ये इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसनचा स्विच हिट सर्वाधिक चर्चेचा विषय बनला होता. फलंदाजांनी असे अनेक वेगळे प्रयोग आजपर्यन्त केले आहेत. पण एका गोलंदाजाने केलेला एक वेगळा प्रयोग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सीके नायडू अंडर-23 मैचमध्ये बंगाल आणि उत्तर प्रदेश यांच्या मॅचमध्ये युपीच्या शिवा सिंगने असा काही बॉल टाकला आहे कि अंपायर देखील चक्रावून गेले होते. अंपायरनी या बॉलला डेड बॉल घोषित करून टाकले. शिवाने ३६० डिग्री फिरत हा बॉल टाकला. बघा व्हिडीओ..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *