सरदार वल्लभभाई पटेल यांनी का घातली होती RSS वर बंदी?

काल सर्वत्र सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरदार पटेल यांची जयंती देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरी केली जाते. देशभरात त्यांच्या जयंतीनिम्मित अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल त्यांच्या जयंतीदिनी भव्य पुतळ्याचे उदघाटन माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झाले. गुजरातमधील सरदार सरोवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे. गुजरातमधील एका छोट्या कुटुंबात जन्मलेले सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे उदघाटन झाले. मोदीजी हे भाजपचे असले तरी ते अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. भाजपाचे कार्यकर्ते नेहमीच सरदार पटेल यांच्यावर अन्याय झाला असा आरोप करतात. सरदार पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बानू शकले असते. पण त्यांच्यावर काँग्रेसकडून अन्याय झाला असे आरोप होतात. संघाने नेहमीच पटेल यांचे कौतुक केले आहे. पण पटेल हे संघाविषयी काय विचार करायचे?

गांधीजींच्या हत्यापुर्वी पटेल यांचे संघाविषयी विचार चांगले होते. पटेल हे राष्ट्रवादी नेते होते. पटेल हे काँग्रेसचे मोठे नेते होते पण त्यांना संघाविषयी कसलीही अडचण नव्हती. त्यांच्या नजरेत संघ हा देशभक्त होता. गांधीजींच्या हत्येच्या अगोदर सरदार पटेल म्हणायचे संघ हा देशभक्त आहे त्यांचे देशावर प्रेम आहे. फक्त त्यांच्या विचारांची दिशा थोडी वेगळी आहे. पण त्यांचे हे विचार गांधीजींची हत्या होण्यापूर्वीचे आहेत. ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसेनि गांधीजींची हत्या केल्यानंतर मात्र अनेक गोष्टी बदलल्या.

सरदार पटेल हे गांधीजींच्या खूप जवळचे होते. त्यांच्या अनेक गोष्टींमध्ये साम्य होते. त्यांच्या दोघांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. गांधीजींच्या हत्येने नेहरू आणि सरदार पटेल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

नथुराम गोडसे हा हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता. RSS आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या सांप्रदायिक द्वेषामुळे वातावरण दूषित झाले. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSS वर बंदी घातली. हि बंदी पुढे दीड वर्षानंतर उठवण्यात आली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *