भारताचे आयर्नमॅन सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी १० अज्ञात गोष्टी..

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ ला गुजरातमधील एका छोट्या कुटुंबात झाला. वल्लभभाई पटेल लहापणीपासूनच खूप जिद्दी आणि मेहनती होते. १९१५ ला लॉ चे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेलेले वल्लभभाई भारतात परतल्यानंतर महात्मा गांधी यांच्यासोबत जोडले गेले. गांधींजींसोबत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भाग घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री बनले. सरदार वल्लभभाई पटेल यांना जगभरात लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन १५ डिसेंबर १९५० ला झाले. आज खासरेवर जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही अज्ञात गोष्टी..

बनू शकले असते पहिले पंतप्रधान

१९३१ साली काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनलेले सरदार वल्लभभाई पटेल हे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून प्रबळ दावेदार होते. पण गांधीजींच्या इच्छेनुसार त्यांनी स्वतःला बाजूला ठेवले. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान बनले.

सर्व राज्य भारताला जोडायचे होते स्वप्न-

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न होते कि सर्व देशी रियासत(राज्य) भारताला जोडायचा होत्या.

IAS-

गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय नागरी सेवांचं(ICS) भारतीयकरण त्यांना भारतीय प्रशासकीय सेवा(IAS) बनवले.

गांधीजींचे निकटवर्तीय होते वल्लभभाई-

सरदार वल्लभभाई पटेल हे गांधीजींच्या अत्यंत जवळचे होते. वल्लभभाई पटेल गांधीजींची प्रत्येक गोष्ट ऐकायचे. गांधीजींचा मृत्यू झाल्यानंतर वल्लभभाईंची तब्येत सुद्धा खराब होत गेली.

५६५ रियासत जोडल्या-

सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रवादी नेते होते, त्यांनी भारतात एकूण ५६५ रियासत जोडल्या.

लग्न-

सरदार वल्लभभाई पटेल यांचे वयाच्या १६ व्य वर्षीच लग्न झाले होते. वल्लभभाई पटेल ३३ वर्षाचे असताना त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांचे पत्नीवर एवढे प्रेम होते कि त्यांनी कुटुंबातील सदस्यांनी विनंती करूनही दुसरे लग्न नाही केले.

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल-

सरदार वल्लभभाई पटेल याना १९९१ ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्टेचू ऑफ़ यूनिटी-

गुजरातमधील सरदार सरोवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया भागात हा जगातला सर्वात मोठा पुतळा उभा राहिला आहे. वयाची नव्वदी पार केलेले मराठमोळे चिरतरुण मूर्तीकार राम सुतार यांनी हा पुतळा बनवला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *