फ्रान्सचा हा रहस्यमय रस्ता दिवसातून 2 वेळा होतो गायब, काय आहे रहस्य?

फ्रान्समध्ये एक असा रस्ता आहे जो दिवसातून दोन वेळा अदृश्य होतो. हा रस्ता बघण्यासाठी वर्षभर पर्यटकांची लगबग इथे सुरू असते. समुद्राच्या मध्ये बनलेला हा रस्ता बघण्यासाठी मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. समुद्रातील लाटांमध्ये हा रस्ता गायब होतो. या रस्त्यावरून प्रवास करणे हा एखाद्या थरारक अनुभवापेक्षा कमी नाहीये. फ्रांस मधील हा रस्ता मुख्य भाग नोइरमौटियर ला जोडतो. याला प्लेसेस डू गोईस म्हणून ओळखले जाते. दिवसातून दोन वेळा दिसल्यानंतर हा रस्ता पाण्याखाली तब्बल 1.3 फूट खोल जातो. दिसायला खुप आकर्षक असणारा हा रस्ता धोकादायक सुद्धा तेवढाच आहे.

आज पाहू तुफानी करूया असे जे म्हणतात अशा लोकांसाठी हा रस्ता खरोखरच खुप रोमांचक आहे. इथे येऊन पर्यटक या रस्त्यावरून गाडी चालवून साहसी अनुभव घेतात. 1701 साली या रस्त्याचा शोध लागला होता. जेव्हा रस्त्यावर समुद्राच्या लाटा येतात तेव्हा हा रस्ता 1.3 फूट पाण्याखाली जतो. या रस्त्याचा शोध लागल्यानंतर इथे मजबूत रस्ता बनवण्यात आला होता.

कार ड्रायव्हरची असते पसंती-

या रस्त्याची लांबी ही 4.5 किलोमीटर आहे. साहसी ड्रायव्हिंगची आवड असणारे ड्रायव्हर इथून गाडी चालवण्यास पसंत करतात. पण तुम्ही सामान्य गाडी ड्रायव्हर असाल तर तुम्ही या रस्त्यावरून जाण्यास घाबरु शकता. पण साहसी ड्रायव्हिंगची आवड असणाऱ्या ड्रायव्हरसाठी तर हा आवडीचा रोड बनला आहे. एवढा धोकादायक रस्ता असूनही इथे चक्क कारच्या रेस आयोजित केल्या जातात. पर्यटक किनाऱ्यावर बसून हा रस्ता बुडताना बघण्याचा आनंद घेतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *