बाळासोबत ड्युटी करणाऱ्या या महिला पोलीस कर्मचारी कोण ? वाचा खासरे

सोशल मिडीयावर विविध फोटो नेहमी वायरल होत असतात. त्यापैकी नुकताच वायरल झालेला फोटो त्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी ह्या आपल्या लहान बाळाला ड्युटीवर सोबत काम करताना दिसत आहे. नेटीझन्सनि अक्षरशः या फोटोवर लाईकचा पाउस दिला आहे. परंतु या फोटोमागील सत्य काय हे अनेकांना माहिती नाही तर आज खासरे वर बघूया बाळासोबत ड्युटी करणाऱ्या या महिला पोलीस कर्मचारी कोण ?

तर हा फोटो आहे उत्तर प्रदेश येथील झाशी जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यातील आहे. इथे अर्चना सिंग नामक महिला पोलीस कॉनस्टेबल आपल्या बाळासोबत ड्युटीवर असतात. या मागील कारण हि तसेच आहे कारण त्याचे पती हे एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यामुळे त्या आपल्या बाळाला घेऊन ड्युटीवर येतात. त्यामुळे याठिकाणी त्या आपल्या बाळाकडे लक्ष देण्याबरोबरच आपली ड्युटीही करु शकतात. सकाळी घरातील सगळी कामे करुन, बाळाचे आवरुन त्या वेळेत ड्युटीवर हजर राहतात. पण थोडा जरी उशीर झाला तरी आपल्याला कोणी ओरडेल याची भिती त्यांच्या मनात असते. आपली मोठी मुलगी सासू-सासऱ्यांकडे राहते. मात्र ही ६ महिन्यांची असल्याने मी तिला सोडून येऊ शकत नाही असे त्या म्हणाल्या.

Times Of India

नेटवर हा फोटो वायरल झाल्यामुळे उत्तरप्रदेश येथील पोलिस उपमहानिरीक्षक यांनी अर्चना यांची आग्रा येथे बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या आपल्या घराजवळ राहून आपले कर्तव्य बजावू शकता. या फोटोमुळे त्यांना पोलीस महानिरीक्षक सुभाष बघेल यांच्याकडून रोख बक्षीस हि मिळाले आहे. आता मूळ गावी बदली झाल्यामुळे त्या आपल्या बाळाला सांभाळून आपली ड्युटी करत आहेत.

या सर्व प्रकारामुळे सोशल मीडियाची ताकद आपल्या लक्षात आली असेल. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला अजिबात विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *