या एका आंदोलनामुळे शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त..

राजकीय पक्षाविषयी अनेकांच्या मनात प्रेम असते. आपल्या नेत्यासाठी पक्षासाठी अनेकजण कोणताही विचार न करता ठाम काही तरी करत असतात. कधी एखादे आंदोलन करून आपण स्वतःवर मोठे संकट ओढवून घेऊ शकतो याचा विचार हि अनेकजण करत नाहीत. सध्या बीड मधील शिवसेनेच्या एका आंदोलनामुळे काही महिला पदाधिकाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

बीड मध्ये शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून मुंडन आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेनेच्या स्वाती जाधव व संगीता चव्हाण या दोन शिवसेना पदाधिकारी यांनी आपल्या डोक्यावरील केस काढून मुंडन केले होते. त्यानंतर त्यांचा सत्कार हि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला होता. पण या आंदोलनाने स्वाती जाधव यांचे जीवनच उद्ध्वस्त होऊन गेले. त्यांच्या पतीने त्यांना सोड चिट्टी देऊन घराबाहेर काढले तर माहेर कडच्या लोकांनी पण त्यांना स्वीकारले नाही. त्यामुळे त्यांना बीड सोडून अहमदनगर येथे एका वडापावच्या गाड्यावर काम करावे लागत आहे.

स्वाती जाधव यांच्या मुंडन आंदोलनानंतर त्यांना शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या कडून कोणतीही साथ मिळाली नाही उलट सर्वानी त्यांची चेष्टाच केली. पक्षप्रेमापोटी आंदोलन करून त्यांना दोन्ही कडून उपेक्षाच मिळाली. हा किस्सा त्यांच्या सहकारी महिलांच्या बाबतीत पण घडला आहे. एका मुंडन आंदोलनाने स्वाती जाधव यांचे पूर्ण जीवनच बदलून गेले. त्यांचे अगोदरचे जीवन एकदम सुरळीत सुरु होते पण त्यांनी टक्कल केलेले कोणालाच पसंद पडले नाही.

या घटनेवर शिवसेना नेत्यांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे आता कोणी जर पक्षासाठी काही आंदोलन करत असेल तर अगोदर कुटुंबाचा विचार करा. आपले कुटुंब सोबत राहते. पक्ष नाही. पण झालेल्या प्रकारामुळे सध्या सर्वत्र नाराजी पसरली आहे. एका आंदोलनाने कोणाचा संसार तुटत असेल तर पक्षाने त्यात लक्ष घालून महिलेला न्याय मिळवून द्यायला हवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *