पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी हे आहेत 15 घरगुती उपाय

वाढत्या वयासोबत होणारे पांढरे केस अनेकांची समस्या असते. तरुण वयात होणारे पांढरे केस अनेकांना आपलं वय वाढल्याची भीती निर्माण करुन देत असतात. त्यामुळेच मग आपलं वय लपवण्यासाठी केसं काळे करणं, ते लपवणं असे प्रकार सुरु होतात. केसांवर कलरचा वापर केल्यास केस कमकुवत होतात. केस पांढरे होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण केस पांढरे होण्यापासून रोखणे आपल्या हातात आहे. काळे केस पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी आणि काळे राहण्यासाठी काही घरगुती उपाय तुमची मदत करु शकतात. यामध्ये आहाराचा समावेश असून हे नैसर्गिक पदार्थ केसांना लावले तरी आपले केस काळे होऊ शकतात.
चला तर मग जाणुन घेऊया कोणता आहार घेतल्यास किंवा कोणत्या प्रकारचे नैसर्गिक पदार्थ केसांना लावल्याने पांढ-या केसांची समस्या दूर होईल.

1) आवळा

लहान आकाराचा असलेला आवळा फक्त आपल्या आरोग्यासाठीच चांगला नाही तर नियमित वापर केल्यानंतर पांढ-या केसांसाठी सुध्दा उपयोगी आहे. आवळा फक्त सेवनच करु नका तर तो मेहेंदीमध्ये मिळवुन केसांना कंडिशनिंगसुध्दा करत रहा. आवळा बारीक कापून गरम खोब-याच्या तेलामध्ये मिळवुन डोक्यावर लावला तरी फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. आवळ्याचा मुरब्बा किंवा लोणचे खावे, याच्या तेलाने केसांची मालिश करावी

2) दही

पांढरे होणारे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी दहीचा वापर करा. यासाठी हिना आणि दही समान प्रमाणात मिळवुन पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांमध्ये लावा. हा घरगुती उपाय आठवड्यातुन दोन वेळा केल्यास केस काळे होतात.
दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन B12 असते. दररोज एक वाटी दही खावे किंवा आठवड्यातून एकदा दह्यामध्ये मीठ टाकून केसांची मालिश करावी.

3) भृंगराज आणि अश्वगंधा

भृंगराज आणि अश्वगंधाचे मुळे केसांसाठी वरदान मानले जाता. याची पेस्ट बनवुन, खोब-याच्या तेलात मिळवुन केसांच्या मुळात एक तासासाठी लावुन ठेवा. मग केसांना कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे केसांची कंडीशनिंग होईल आणि पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.

4) कांदा

कांदा तुमच्या पांढ-या केसांना काळे करण्यासाठी मदत करते. केस धुण्या अगोदर केसांना कांद्याची पेस्ट लावा थोडा वेळानंतर केस धुवा. तुम्ही नियमित काही दिवस असे केल्याने केस काळे होतील. केसांमध्ये एक वेगळीच चमक येईल आणि केस गळतीसुध्दा थांबेल.

5) शुध्द तुप

जुन्या लोकांना तुम्ही नेहमी डोक्यावर गावरान तुपाने मालिश करताना पाहीले असेल. शुध्द तुपाने केसांची मालिश केल्याने त्वचेला पोषण मिळते. प्रतिदिवस शुध्द तुपाने डोक्याची मालिश केल्याने केसांना पांढरे होण्यापासुन वाचवता येऊ शकते.

6) कडीपत्ता

पांढ-या होणा-या केसांसाठी कडीपत्ता खुप चांगला मानला जातो. आंघोळीच्या पाण्यात एक तास अगोदर काही कडीपत्त्याचे पाने टाका. नंतरच त्या पाण्याने केस धुवा. तुम्ही आवळ्या प्रमाणेच कडीपत्त्याला बारीक कापुन गरम खोब-याच्या तेल मिळवुन लावु शकता. हा प्रयोग नियमित केल्याने तुमचे पांढरे केस नक्की काळे होतील. तसंच यामध्ये आयर्न आणि फॉलिक अॅसिडची पर्याप्त मात्रा असते. आहारात याचे प्रमाण वाढवल्यास पांढरे केस लवकर काळे होऊ लागतील.

7) चीज आणि पनीर

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन B आणि कॅल्शिअम असते. आहारात याचे प्रमाण वाढवल्यास केस काळे आणि दाट होतील

8) मेथीदाणे

यामध्ये आर्यन आणि फायबरचे पर्याप्त प्रमाण असते. रात्रभर मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणे प्यावे किंवा याने केस धुवावेत

9) नारळ

यामध्ये व्हिटॅमिन इ कॉम्प्लेक्स, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंट्सचे पर्याप्त प्रमाण असते. दररोज कच्चे नारळ खावे किंवा पाणी प्यावे. कोमट नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून केसांची मालिश करावी.

10) हिरव्या पालेभाज्या

यामधून फॉलिक अॅसिड, आयर्न आणि व्हिटॅमिन A ची पर्याप्त मात्र मिळेल. ज्यामुळे केस काळे आणि मजबूत होतील

11) दूध

दररोज एक ग्लास दूध घेतल्यास प्रोटीन आणि कॅल्शिअम मिळेल. यामुळे केस चमकदार आणि मजबूत होण्यास मदत मिळेल. गायीच्या दूधानेही पांढरे केस काळे होऊ शकतात. गाईचे दूध केसांमध्ये लावल्याने नैसर्गिकरित्या केस काळे होतात. आठवड्यातुन एकदा हा प्रयोग केल्यास लवकरच तुमचे पांढरे केस काळे होतील.

12) ड्राय फ्रूट्स

दररोज 6 बदाम, 10 मनुके, 1 अंजीर आणि 7 पिस्ते खावेत. यामधून मिळणार न्यूट्रिएंट्स केसांना काळे करण्यास मदत करतील

13) मासे, अंडी

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होतात. आठवड्यातून एकदा तरी मासे खाल्ल्यास ही कमतरता दूर होते.
तसंच अंड्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन B असते. रोज नाश्त्यामध्ये एक अंडे खावे किंवा केसांना अंड्यातील बलक लावून मालिश करावी. अर्ध्या तासाने शाम्पूने केस धुवून घ्यावेत

14) कॉफी आणि काळी चहा

केस पांढरे होत असतील तर ब्लॅक टी आणि कॉफीचा वापर करा. पांढ-या झालेल्या केसांना जर तुम्ही कॉफीच्या अर्काने धुतले तर तुमचे पांढरे होणार केस काळे होतील. असे तुम्ही 3-4 दिवसांमध्ये करत रहा.

15) कोरफड

केसांमध्ये कोरफड जेल लावल्यानेही पांढरे केस आणि केस गळती बंद होते. यासाठी तुम्ही एलोवेरा जेलमध्ये लिंबूचा रस मिळवुन चांगली पेस्ट बनवुन घ्या आणि ही पेस्ट केसांना लावा. आठवड्यातुन 1-2 वेळा असे नियमित केल्याने तुमची पांढ-या केसांची समस्या दूर होऊ शकते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *