वृत्तपत्रावर हे चार रंगीत ठिपके का असतात ? वाचा खासरे कारण

बिंदी किंवा रंगीत ठिपका हा अनेक स्त्रियांच्या माथ्यावर आपण बघतो. परंतु वृत्तपत्राच्या तळाशी प्रत्येक वेळेस हे चार रंगीत ठिपके का असतात यांचा शोध अनेकांना लागला नाही आहे. काय अर्थ असेल या ठिपक्यांचा आपल्याला कळला का ? असे तर नाही कि वृत्तपत्रात हा ठिपका चुकीने आला असेल पण रोज हि चूक का होत असावी हा हि प्रश्न आहे.

या सर्व प्रश्नाची उत्तर आमच्याकडे आहेत. आजकाल रंगीत टीव्हीचा काळ आहे. वृत्तपत्र देखील रंगीत आहेत. तो काळ वेगळा जेव्हा सगळ काही कृष्णधवल म्हणजे black n white असायचं. तर गोष्ट अशी आहे कि वृत्रावर कलर पैटर्न बनविण्याकरिता बिंदी किंवा या मार्करचा उपयोग केल्या जातो. आपण सगळे लहानपणी शाळेत हे शिकलो कि मुख्य तीन रंग असतात. लाल, पिवळा व नीला हाच पैटर्न प्रिंटर मध्ये देखील असतो. तर हे चार ठिपके आहेत CMYK क्रम आहेत. C म्हणजे CYAN इथे याचा अर्थ होतो नीला आणि M म्हणजे Magenta याचा अर्थ होतो गुलाबी आणि Yellow व Black म्हणजेच पिवळा व काळा रंग असा होतो. जर हे ठिपके योग्य क्रमात असेल तर पेपर छपाई योग्य होते नाहीतर रंगावर रंग एकत्र होतो आणि सर्व पेपरचा सत्यानाश झाला समजा.

अश्या प्रकारे हे ठिपके का लावण्यात येतात हे आपल्याला समजले असेल. आता आपल्याला हि माहिती आवडली तर जास्त काही करू नका फक्त पेज लाईक करायला विसरू नका आणि शेअर जरूर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *