महाराष्ट्रातील या गावात पुरुष करतात अनेक महिला सोबत लग्न कारण वाचून थक्क व्हाल

जुन्या काळात बहुपत्नीत्व हि एक सामान्य गोष्ट होती. परंतु आजच्या काळात या गोष्टीस समाजमान्यता मिळणे कठीण आहे. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला हे उदाहरण दिसतील. परंतु महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे पुरुष अनेक स्त्रियासोबत लग्न करतात या मागील कारण हि तसेच अजबगजब आहे.

महाराष्ट्रातील मुंबई जवळ असलेले डेंगनमल नावाचे एक छोटे खेडे वसलेले आहे. मुंबई पासून हे गाव जवळपास १५० किमी अंतरावर असणार या गावात अनेक लग्न करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. इथल्या पंचाणा देखील हि गोष्ट मान्य आहे. या मागील कारण आता आपण बघूया याचे कारण असे आहे कि हे संपूर्ण गाव पाण्याकरिता फक्त दोन विहिरीवर अवलंबून आहे. विहिरीतून पाणी आणण्याकरिता सहा किलोमीटरची त्यांना पायपीट करावी लागते. एकटी स्त्री एवढे काम करू शकत नसल्याने गावातील लोकांनी दोन लग्न करायला सुरवात केली. यांना जलपत्नी देखील म्हटल्या जाते.

जलपत्नी मुख्यतः विधवा शोधल्या जातात. यांना दिवसभर पाणी आणायचे काम दिल्या जाते. बाकी यांना स्वतःच्या नवऱ्यासोबत शारीरक संबंध ठेवण्यास मनाई आहे. भारतातील हे गाव आपल्याला धोक्याची घंटा देत आहेत कि आपल्या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग आपण योग्य प्रकारे नाही केला तर पुढे येणारा काळ आणखी भयंकर येणार आहे. महाराष्ट्रात लातूरला मागील वर्षी रेल्वेने पाणी पुरवठा करायचे काम पडले. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे आपले कर्तव्य आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला अजिबात विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *