रोज सकाळी लसणाचा चहा पिल्याने होतात हे 5 चमत्कारिक फायदे…

लसूण ही आरोग्यासाठी खूप उपयुक्त असणारी गोष्ट आहे. पण बरेच जण लसणाच्या उग्र वासामुळे तो खाण्यास टाळतात. लसणात अनेक औषधीय गुण आहेत. पण बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसते. मागील हजारो वर्षापासून लसूण भारतात एक औषधी म्हणून वापरला जातो. सहसा सर्वच जणांच्या रोजच्या जेवणात लसणाचा समावेश असतोच, पण तो नसेल तर अवश्य करा. लसूण हे हृदयरोग, कफ, पचनाच्या तक्रारीसाठी उपयुक्त ठरते. लसणाच्या नियमित सेवनाने अनेक आजार दूर होऊ शकतात.

लसणातून अ, ब आणि क जीवनसत्वासह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम सारखे पोषक तत्व मिळतातच पण लसूण चहा पिल्यानंतर सुद्धा काही चमत्कारिक फायदे होतात. चला जाणून घेऊया फायदे आणि कसा बनवायचा लसणाची चहा…

असा बनवा लसणाचा चहा..

लसणाचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला लागते 1 लसणाची कळी, 2 छोटे ग्लास पाणी, 1 चमचा मध, 1 चमचा लिंबूचा रस आणि 1 चमचा किसलेले अद्रक. हे सर्व सामुग्री जमा केल्यानंतर अगोदर एक ग्लास पाणी उकळून घेऊन त्यात लसूण आणि अद्रक पेस्ट टाका. 15 मिनिटे कमी आसेवर त्याला शिजू द्या. चांगली उकळी आल्यानंतर त्याला 10 मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर ते गाळून त्यात एक चमचा मध टाका. तुमचा लसणाचा चहा तयार होईल.

लसणाच्या चहाचे फायदे-

1. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायी ठरते. यामुळे शरीराचं मेंटबॉलीसम आणि पचनक्रिया चांगली राहते.

2. लसूण हृदयरोगासाठी फायद्याचा असतोच. पण हा चहाही त्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. लसणाच्या चहामुळे ब्लड सर्कुलेशन सामन्य राहते.

3. हा चहा शरीरातील अधिकचे फॅट्स बरं5करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. या चहाचे सेवन केल्यास शरीरातील टॉक्सिक पदार्थ दूर होतात.

4. लसणाच्या चहामुळे इम्युनिटी वाढते. कोलेस्ट्रॉल ज्यांचं नेहमी वाढलेलं असते त्यांच्यासाठी तर हा चहा खूपच उपयुक्त ठरतो.

5. लसणाच्या चहातुन आपल्याला अँटिबायोटिक मिळते. ज्यामुळे सर्दी, खोकला या समस्या दूर होतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *