संभाजीराजे यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांचा जीवनप्रवास..

सध्या स्वराज्यरक्षक सिरीयल सर्व महाराष्ट्रात टीआरपीच्या बाबतीत अव्वल आहे. त्या सिरीयल मध्ये संभाजी महाराज यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या फॅन फोल्लोविंग मध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांच्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचे आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत अमोल कोल्हे यांच्या प्रत्येक्ष जीवनाबद्दल.

अमोल कोल्हे यांचे पूर्ण नाव डॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले त्यानंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.आणि काही वर्ष त्यांनी मुंबई येथील केईएम हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली. अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असणाऱ्या अमोल कोल्हे यांना बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आकर्षण होते.

महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी नाटकांच्या माध्यमातून आपला अभिनयातील प्रवास सुरु केला.या प्रवासाला खऱ्या अर्थाने भरारी मिळाली ती स्टार प्रवाह या वाहिनीवरील राजा शिवछत्रपती या सिरीयलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेने. शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे डॉ अमोल कोल्हे यांची ओळख घराघरात निर्माण झाली. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी अनेक चित्रपट आणि नाटकात कामे केले. अरे आवाज कुणाचा, आघात, ऑन ड्यूटी २४ तास, मराठी टायगर्स , रमा माधव, राजमाता जिजाऊ, मुलगा, साहेब इत्यादी चित्रपटातून ते आपल्या समोर आले.

अमोल कोल्हे यांच्या पत्नी अाश्विनी या डॉक्टर असून त्या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अमोल आणि अाश्विनी ह्यांना दोन मुले आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा त्याची नावे आद्या आणि रुद्र. डॉ. अमोल कोल्हे सध्या मुंबईत स्थायिक आहेत. त्यांनी २०१४ साली राजकारणात हि प्रवेश केला व ते शिवसेना या पक्षात पुणे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सध्या स्वराज्य रक्षक संभाजी सिरीयल साठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि आता त्यांच्या भूमिकेला सर्वत्र वाहवाह मिळत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *