हॉलीवुडने लक्षात ठेवला इतिहासातील मराठा, पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन मधुन आणला उजेडात

पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन चित्रपटाचा तिसरा भाग ‘एट वर्ल्डस एंड’ जवळपास प्रत्येकाने पाहिला असेल, त्यात एक पायरेट लॉर्ड (म्हणजे समुद्री लुटेरा) ‘श्री संभाजी’ म्हणून पात्र आहे, हे दुसरेतिसरे कोणी नसून मराठा आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे आहेत.

शिवरायांनी स्थापन केलेले हे राज्य छत्रपती शाहू महाराजांनी उत्कर्षाला नेले, त्यांनी कान्होजी आंग्रेंना मानसपुत्र मानले होते.त्यांचाच मुलगा हा संभाजी आंग्रे.परंतु दुर्दैवाने पोर्तुगीज,इंग्रज आणि पेशव्यांच्या सोबतच्या वादामुळे आणि लढायांमुळे त्यांच्यावर मुद्दाम लुटारू हा शिक्का मारला गेला.

केवळ परदेशीच नव्हे तर काही दीडशहाण्या भारतीय लेखकांनी सुद्धा आंग्रे घराण्याला लुटारुंच्या यादीत नेऊन बसवले यात प्रमुख होते ‘राजाराम नारायण सालेटोर’ हे लेखक.जॉन बिडूल्फ,बाल्डविन,ग्रेस मूर यांच्यासारखे परदेशी लेखक हि यात होतेच.

संपूर्ण हिंदुस्तान ची चौथाई वसूल करणाऱ्या सर्वशक्तिशाली छत्रपती थोरल्या शाहू महाराजांचे आंग्रे हे निष्ठावंत सेवक होते.परंतु आपल्याच लोकांच्या चुकीमुळे त्यांच्यावर ‘पायरेट’ असण्याचा शिक्का बसला.

पेशव्यांची महत्वाकांशा आणि शाहूंच्या निधनानंतर इंग्रजांबरोबर पेशव्यांनी हातमिळवणी करून केलेला आंग्रे आणि मराठा आरमाराचा नाश, हि दोन कारणे आंग्रे यांना ‘पायरेट लॉर्ड ‘ बनविण्यात प्रमुख ठरली. संभाजी आंग्रे सारख्या शूर सेनानीला जॅक स्पॅरो च्या पंक्तीत नेऊन बसवले याहून दुर्दैव ते काय असावे.

या पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन चित्रपटामुळे संभाजी आंग्रे यांचे नाव जगभर पोचले परंतु चुकीच्या रूपाने पोचले याचा खेद नेहमीच असेल. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

छायाचित्रात – १. जॅक स्पॅरो २. संभाजी आंग्रे (चित्रपटातील पात्राचा फोटो ) ३. कान्होजी आंग्रे ४. युरोपातील १७३७ सालचे वर्तमानपत्र (ज्यात आंग्रे यांचा पायरेट असा उल्लेख आहे ) ५. सालेटोर यांचे इंडियन पायरेट्स पुस्तक ६. पेनेल याचे ‘बांडीट एट सी’ पुस्तक.
साभार:- आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *