अमृतसर दुर्घटनेतील ट्रेनच्या ड्रॉयव्हरने खरोखर आत्महत्या केली का? वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य..

पंजाबच्या अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम चालू असलेल्या लोकांना ट्रेनने उडवलं. या भीषण अपघातात ६१ जणांचा मृत्यू झाला तर ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले. अमृतसरच्या जोडा फाटक परिसरात रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोक ट्रॅकवर रावण दहन पाहत असताना तिथून डेम्यू ट्रेन जात होती. अवघ्या पाच सेकंदात चहुकडे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पण कार्यक्रमाच्या आयोजकांनी देखील खबरदारी घ्यायला हवी होती.

या घटनेनंतर ट्रेनच्या लोकोपायलटला देखील काहींनी दोषी ठरवून टाकले होते. अनेकांना प्रश्न पडला होता कि एवढी गर्दी समोर दिसूनही ड्रायव्हरने इमर्जन्सी ब्रेक का लावले नाहीत. पण याचे देखील उत्तर समोर आले आणि ट्रेन आणि लोको पायलटची काही चूक नसल्याचे निष्पन्न झाले. ट्रेन ड्रायव्हरला अंधारामुळे लोकांच्या जवळ आल्यानंतर गर्दी दिसली. त्यांनी इमर्जन्सी ब्रेक्स लावले. पण ट्रेनचा स्पीड कमी झाला पन ती थांबली नाही. पुढे काही अंतरावर ट्रेन थांबत होती पण लोकांनी ट्रेनवर दगडफेक करण्यात सुरुवात केली. त्यामुळे लोकोपायलट ने ट्रेन पुढे नेली आणि दुसऱ्या स्टेशनवर थांबवली.

हे सर्व घडल्यानंतर आज त्या लोकोपायलटने आत्महत्या केल्याच्या बातम्या आणि पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. पण यामध्ये कुठलेही तथ्य नसून हि एक अफवा असल्याचे समोर आले आहे. एका दुसऱ्याच व्यक्तीचा गळफास घेऊन आत्महत्या केलेला फोटो यासोबत वायरल झाला आहे.

पण या ट्रेनचा लोकोपायलट जिवंत असून त्याने आत्महत्या केली नाहीये. तो वायरल झालेला फोटो अमृतसर आणि तरणतरण दरम्यान आत्महत्या केलेल्या एका व्यक्तीचा आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *