समोर गर्दी दिसूनही ट्रेन ड्रायव्हर गाडी का नाही थांबवत?

काल रात्री अमृतसर येथे रावण दहनाच्या कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ६१ लोकांचे प्राण गेले आहेत. पटरीच्या कडेला उभा राहून तर काही लोक पटरीच्या मध्ये उभा राहून हा कार्यक्रम बघत होते. आयोजकांनी इथे कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे. लोकं मोबाईल मध्ये शूटिंग घेण्यात मग्न होते. त्यादरम्यानच काळाने घाला घातला. फटाक्यांची आतिषबाजी सुरु असल्याने ट्रेनचे हॉर्न लोकांना ऐकू आलं नाही. पण एवढी मोठी दुर्घटना झाल्याने अनेकांच्या मनात हा देखील प्रश्न आला कि एवढी गर्दी समोर दिसूनही ट्रेनच्या ड्रॉयव्हरने ब्रेक का लावले नाही?

घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ट्रेनची स्पीड खूप जास्त असल्याचे दिसते. ड्रायव्हर स्पीड कमी करू शकला असता किंवा ब्रेक लावले असते तर एवढे प्राण वाचले असते? जाणून घेऊया ट्रेनच्या ब्रेकिंग सिस्टीम विषयी..

ट्रेनमध्ये आपल्या ट्रक सारखेच ब्रेक असतात, ते म्हणजे एअर ब्रेक. पण ट्रक सारखा वापर मात्र याचा केला जात नाही. सहसा लोको पायलटच्या हातात ब्रेक कधी लावावे आणि कधी नाही हे नसते. कारण ट्रेन या सिग्नलनुसार आणि गाडीच्या गार्डच्या निर्देशाने चालतात. लोकोपायलट हा गार्डसोबत ब्रेक लावण्याचा निर्णय घेऊ शकतो. ट्रेंन ज्या गतीने धावते ते काम ब्रेक लावण्याच्या कामापेक्षा सोपे आहे. ट्रेनला २ ब्रेक असतात, ज्यामध्ये एक इंजिनला तर दुसरे पूर्ण डब्यांना. प्रत्येक डब्याच्या चाकाचे ब्रेक हे पाईप सोबत जोडलेले असतात.जेव्हा पिवळ्या रंगाचं सिग्नल दिसते तेव्हा लोकोपायलट हा ब्रेक लावण्यास सुरुवात करतो.

लोकोपायलट ने ब्रेक लिव्हर फिरवले कि ब्रेक पाईप मधील हवा कमी होऊन ब्रेक शु चाकांना घासतात आणि गाडी ब्रेक व्हायला लागते.गाडीला पिवळा सिग्नल दिसल्यास गाडी कमी स्पीड ने चालत राहते. पण लाल सिग्नल झाल्यास गाडी पायलटला सिग्नलच्या अगोदर थांबवावी लागते. गाडीने लाल सिग्नल क्रॉस केल्यास ती खुप गंभीर समजले जाते.

इमर्जन्सी ब्रेक्स कधी लावले जातात?

लोको पायलटला समोर काही दिसल्यास किंवा पटरी खराब झालेली दिसल्यास किंवा अन्य काही असा मोठा अडथळा वाटल्यास लोको पायलट इमर्जन्सी ब्रेक लावू शकतो. पण इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतर ट्रेन ८००-९०० मीटरवर जाऊन पूर्णपणे थांबते.

समोर गर्दी दिसूनही ट्रेन ड्रायव्हर गाडी का नाही थांबवत?

लोकोपायलटला इमर्जन्सी ब्रेक लावायचे झाल्यास त्याला दुरूनच पटरीवर काही आहे हे दिसायला हवे. रात्रीच्या वेळी तर इमर्जन्सी ब्रेकचा वापर हा अधिकच कठीण असतो. लोकोपायलटला फक्त पटरीच दिसते. त्यामुळे हॉर्न हा एकमेव शेवटचा पर्याय त्यांच्याकडे असतो.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *