पहिल्यांदा रितेश व जेनेलिया एकमेकासोबत काय बोलले? वाचा मजेदार किस्सा..

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांची डेब्यू फिल्म तुझे मेरी कसम चांगलाच सुपरहिट झाला होता. याच सिनेमापासून रितेश आणि जेनेलियाची मैत्री झाली आणि पुढे बहरत गेली. स्वतःबद्दल आणि जेनेलियाबद्दल अनेक मजेशीर आठवणी रितेशने सांगीतल्या आहेत.

बॉलीवूड मध्ये अनेक सेलेब्रिटीना सेटवरच प्रेम झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलेलं आहे. पण रितेश देशमुख आणि जेनेलिया हे याबाबतीत सर्वांचे खूप आवडतं जोडपे आहे. तुझे मेरी कसम पासून सुरू झालेली लव्हस्टोरी खूप बहरत गेली. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केले. त्यांना आता दोन मुले सुद्धा आहेत. तुझे मेरी कसम नंतर हे सर्वांच फेवरेट कपल बनलं आहे. तुझे मेरी कसम नंतर त्यांना मस्ती आणि तेरे नाल लव्ह हो गया सिनेमात पाहिलं गेलं.

रितेश आणि जेनेलियाची भेट पहिल्यांदा तुझे मेरे कसम च्या निमित्ताने हैद्राबाद विमानतळावर झाली होती. जेनेलिया रिटेशची विमानतळावर रिटेशची वाट बघत उभी होती. तिला अगोदरच कल्पना होती की रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. त्यामुळे तिचा समज होता की तो खूप घमंडी असेल. जेनेलियाने त्याला यामुळे तिथे भावच दिला नव्हता. पण पूढे शुटिंगदरम्यान तिला रितेश खूप चांगला असल्याचे लक्षात आले.

रितेश ने शुटिंगदरम्यानचे खूप मजेशीर किस्से सांगितले आहेत. पहिल्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान पहिले दोन दिवस जेनेलिया रितेश सोबत बोललीच नव्हती. याचे कारण असे की त्यावेळी रितेश देशमुखचे वडील दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. रितेशने जेनेलिया सोबतचे पहिले संभाषण सुद्धा शेअर केले आहे. जेनेलियाने रितेशला पहिला प्रश्न विचारला होता की, ‘तुझी सेक्युरिटी कुठे आहे?’ यावर रितेशने मला काही सेक्युरिटी नाहीये असे उत्तर दिले होते. रितेशने अशाच खास गोष्टींना ट्विट करून उजाळा दिला आहे.

रितेशने सिनेमाचे पोस्टर शेअर करुन डायरेक्टरचे सुद्धा आभार मानले आहेत. डेब्यू सिनेमाने त्याचे आयुष्य बदललं. आर्किटेक्ट चा अभिनेता झालो. यासाठी त्याने डायरेक्टर विजया भास्कर प्रोड्युसर रामोजी राव आणि सिनेमॅटोग्राफर कबीर लाल याना धन्यवाद दिले.

तुम्हीसुद्धा रितेश आणि जेनेलियाच्या या एव्हरग्रीन केमिस्ट्रीचे चाहते असाल तर माहिती अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *