शिखर धवन आहे आपल्या पत्नीपेक्षा वयाने 10 वर्ष लहान, जाणून घ्या क्रिकेट विश्वातील असे 8 जोडपे..

प्रेमामध्ये रंग, रूप, वय, पैसे, जात आणि धर्म या गोष्टींना थोडीही किंमत दिली जात नसल्याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. प्रेम एकदा झालं की मग त्यावर कोणत्याच गोष्टीचा ताबा नाही रहात. मग तो एखादा सामान्य व्यक्ती असो किंवा एखादा मोठा सेलिब्रिटी. क्रिकेटपटू सुद्धा यामध्ये मागे नाहीयेत. आज आपण अशाच 8 क्रिकेटपटूबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या प्रेमप्रकरणातून आपला जोडीदार निवडला. पण या क्रिकेटपटूमध्ये आणि त्यांच्या जोडीदाराच्या वयामध्ये कमालीचे अंतर आहे. यामध्ये काही जण आपल्या पत्नीपेक्षा 18 वर्षाने मोठे आहेत तर काही जण 10 वर्ष छोटे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे क्रिकेटपटू…

8. महेंद्रसिंग धोनी-

महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीची लव्हस्टोरी सर्वश्रुत आहे. 2010 मध्ये धोनी आणि साक्षी यांचे लग्न झाले होते. पण धोनी आणि साक्षीच्या वयामध्ये तब्बल 8 वर्षाचा फरक आहे. सध्या धोनीचे वय 36 आहे तर साक्षी ही 28 वर्षाची आहे.

7. इरफान पठाण-

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण ने फेब्रुवारी 2016 मध्ये सफा बेग हिच्याशी दुबईत लग्न केले. सफा ही गल्फ देशात एक मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे.इरफान आणि सफाच्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक आहे. इरफानचे वय हे 32 वर्ष असून सफा ही 2 अवघ्या 22 वर्षाची आहे.

6. शिखर धवन-

भारताचा स्टार ओपनिंग बॅट्समन शिखर धवनची पत्नी एशा मुखर्जी ही ऑस्ट्रेलियन बॉक्सर राहिलेली आहे. फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पासून सुरू झालेली यांची मैत्री 2012 मध्ये लग्नापर्यंत येऊन पोहचली. पण जोडप्याच्या वयामध्ये खूप मोठे अंतर आहे. शिखर धवन हा 31 वर्षाचा असून एशा ही 41 वर्षाची आहे.

5. शोएब अख्तर-

रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि त्याची पत्नी रुबाब यांच्या वयामध्ये खूप मोठा फरक आहे. शोएबचे वय हे 41 वर्ष असून रुबाब ही अवघ्या 23 वर्षाची आहे.

4. सचिन तेंडुलकर-

क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन आणि अंजलीची लव्ह स्टोरी 1990 मध्ये चालू झाली होती. काही वर्ष दडेट केल्यानंतर त्यांनी 1995 ला लग्न केले. पण सचिन आपल्या पत्नीपेक्षा 6 वर्षे छोटा आहे. सचिनचे वय हे 44 वर्षे असून अंजली 50 वर्षाच्या आहेत.

3. दिनेश कार्तिक-

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने दोन वेळा लग्न केले आहे. पहिली पत्नी निकिता सोबत तलाकनंतर त्याने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय स्क्वेश खेळाडू दीपिका पल्लीकल सोबत लग्न केलं. दीपिका दिनेश कार्तिकपेक्षा 6 वर्ष छोटी आहे. दिनेशचे वय 31 आहे तर दीपिका 25 वर्षाची आहे.

2. ग्लेन मेग्रा-

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ग्लेन मेग्रा यांच्या पत्नीचं कैंसर सर्जरी दरम्यान निधन झाल्यानंतर त्यांनी 2010 मध्ये इंटिरियर डिझाइनर सारा लिओनार्डीसोबत लग्न केले.मेग्रा हे सारा पेक्षा 12 वर्षे मोठे आहेत. मेग्रा हे 47 वर्षाचे असून सारा 35 वर्षाची आहे.

1. वसीम अक्रम-

पाकिस्तानचे माजी गोलंदाज वसीम अक्रमची पहिली पत्नी हुमा यांचे 2009 मध्ये निधन झाले. यानंतर त्यांनी 2013 मध्ये मेलबर्नला जन्मलेल्या शानीयरासोबत लग्न केले. वसीम अक्रम आणि शानीयरा यांच्या वयात तब्बल 17 वर्षाचा फरक आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *