पाकिस्तानच्या अजहर अलीच्या रनआऊटने पोट धरून हसला असाल, पण त्यापेक्षा मजेदार आहे हे रनआऊट..

काल दिवसभर सोशल मीडियावर पाकिस्तानचा फलंदाज अजहर अलीला ट्रोल करण्यात आले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीमध्ये काल तो त्याच्या चुकीने रनआऊट झाला. त्यानंतर पूर्ण पाकिस्तान टीमची खिल्ली उडवण्यात आली. अजहरने सीमारेषेकडे मारलेला बॉल चौक गेला समजून तो मधेच जाऊन उभा राहिला. पण ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी चतुराई दाखवत त्याला रनआऊट केले. याच रनआऊटच्या तोडीस तोड असे रनआऊट आज पुन्हा समोर आले आहे. न्यूझीलंड मधील एका लोकल सामन्यात हे रनआऊट झाले आहे. बघा हे नव्याने व्हायरल झालेले मजेदार रनआऊट..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *