दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते दिवाळी? वाचून धक्काच बसेल..

दसरा (Dasara) :-
अश्विन शुध्द दशमीला दसरा हा एक सण साजरा करतात. या तिथीला ‘ विजयादशमी ‘ असे म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र नवव्या दिवशी ( नवमीला ) उठवतात , तर काही ठिकाणी दहाव्या दिवशी उठवतात. या दिवशी सीमोल्लघन , शमीपूजन , अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा चार गोष्टी करायच्या असतात. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात. हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. पूर्वी हा कृषीमहोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पिक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. कित्येक जण नवमीच्या दिवशी शेतात तयार झालेले भाताचे लोंगर घरी आणून त्यांची पूजा करतात. घराच्या प्रवेशद्वारी हे लोंगर टांगून ठेवतात. कोकणात हे कणसे घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना भांडून ठेवण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात किंवा ती लुटतात असे म्हणतात.

ह्या मागे एक कथा प्राचीन काळातील म्हणजे रामाच्याही आधीची , रघुवंशातील राघुरायाची कथा आहे ती अशी, एकदा रघुराजाने ‘ विश्वजित ‘ नावाचा यज्ञ केला. विश्वजित यज्ञ म्हणजे, आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकायची आणि जिंकलेले सारे राज्य , सोने नाणे , रत्ने हे गरजू लोकांना दान करून टाकायचे. राघुराजाचा हा यज्ञ संपला. त्याने आपल्या सगळ्या गोष्टींचे दान केलें.दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय मिळविला. पांडवांना वनवास पत्करावा लागला होता, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवली होती. पुढे वनवास, अज्ञातवास संपल्यावर, शमीच्या धोलीतील शस्त्रे काढून विराटाच्या गायी पळविणाऱ्या कौरवांवर त्यांनी स्वारी केली आणि त्यात विजय मिळविला , तो ही ह्याच दिवशी , असे मानतात. त्यामुळे या दिवसाला ‘ विजयादशमी ‘ असे नाव मिळाले. आणि याचमुळे दसऱ्याच्या दिवशी शमीची व शास्त्रात्रांची पूजा करण्याही प्रथा सुरु झाली असे म्हणतात.

दीपावली ( दिवाळी ) ( Divali ) :-

दीपावलीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुध्द द्वितेयेपर्यंत म्हणजे पाच दिवस साजरा करतात. यात धनत्रयोदशी , नरक चतुर्थशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश असतो. दिवाळीच्या सणाला लहान मुले मातीचे किल्ले करण्यात दंग असतात. घरातील स्त्रिया दिवाळीच्या आधी दोन / चार दिवसापासून फराळाचे पदार्थ बनविण्यात दंग असतात. प्रत्येकाच्या घरात फराळांच्या पदार्थांचा , उटणे , वासाचे तेल ह्यांचे सुगंध दरवळत असतात. घरासमोर अंगणात रांगोळ्या काढल्या जातात. त्यात अत्यंत सुंदर असे निरनिराळे रंग भरले जातात. निरनिराळ्या आकाराचे आणि रंगांचे आकाशकंदील घराच्या बाहेर लावले जातात. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट असतो. खेडेगावात घरासमोरील अंगणात शेणाचा सडा घालतात आणि त्यावर वेग वेगळ्या रंगानी भरलेली रांगोळी काढतात. एक वेगळ्याच प्रकारचा तो वास हवेत दरवळत असतो. तो सुगंधच खेडेगावाची ओळख.

जाणकारांच्या मते प्रभू श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहचायला 21 दिवस लागले होते. त्यामुळे दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी दिवाळी येते. दसरा आणि दिवाळी हे फार पूर्वीपासून परंपरेने चालत आलेले सण आहेत. श्रीलंकेतून अयोध्येत पोहचायला बरोबर 21 दिवस लागतात याची खात्री करण्यासाठी तुम्ही गूगल मॅप वर शोधू शकता. त्यामुळे दसरा दिवाळीचे वेळेचे तथ्य आज तुम्हाला पटेल.

ही माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.
जाणून घ्या कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

1 comment

  1. Swatahachya dharmacha respect kara apanch aplya hindu dharmabaddal kahihi tika karta mg dusre lok ka nahi karnar
    Dusrya dharmache lok tyanchya dharmabaddal te kadhi asa kahi boltat ka ani dusryAna hi bolayla nahi det kadhi fakt aplech lok swatachya dharmabaddal respect na thevta ase doubts gheun dharmacha apman kartat

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *