लोन देण्याच्या बदल्यात बँक मॅनेजरने केली शरीरसुखाची मागणी, महिलेने धो धो धुतले..

सध्या सर्वत्र #metoo या चळवळीच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना बाहेर येत आहे. यामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत आरोप चालू झाले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर हि चळवळ भारतात माहिती झाली. त्यानंतर जेष्ठ अभिनेते अलोकनाथ, सलमान खान यांच्यावर पण आरोप झाल्याने खळबळ उडाली. एवढे सर्व काही होत असताना अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. कर्नाटक मधील दावणगिरी मध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोन देण्याच्या बदल्यात बँक मॅनेजरने महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार घडला. पण या महिलेने अत्याचार सहन न करता त्या मॅनेजरला धो धो धुतले आहे.

कर्नाटक राज्यात दावणगिरी हा जिल्हा आहे. या दावणगिरीतील DHFL बँकेत देवैया नामक व्यक्ती हा बँक मॅनेजर आहे. या बँकेत पीडित महिलेने २ लाख रुपये लोन मिळावे यासाठी अर्ज केला होता. पण महिलेचे लोन मंजूर करण्यासाठी मॅनेजरने शरीरसुखाची मागणी केली. ते ऐकून महिलेला धक्काच बसला. पीडित महिलेने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा दावाही केला आहे. महिलेने मॅनेजरचे ते शब्द ऐकून त्याला कॉलरला धरून बाहेर ओढत आणले आणि लाकडी दंडुक्याने मारण्यास सुरुवात केली. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी मारहाण करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हीडिओ त्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील झाला आहे. महिलेने या व्यक्तीला लाकडानेच नाही तर नंतर लाथा बुक्क्यांनी देखील मारहाण करून चांगलाच धडा शिकवला आहे.

बघा व्हिडीओ-

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *